शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

‘सौराष्ट्र तमिळ संगमम’ एक्स्प्रेसचे जळगाव स्टेशनवर वाजत-गाजत स्वागत

By विलास.बारी | Updated: April 18, 2023 19:24 IST

या एक्स्प्रेससोबतच त्यांना या यात्रेबाबत आलेल्या अनुभवांचे अभिप्राय देखील रेल्वेकडून घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ उपक्रमाअंतर्गत दोन वेगवेगळ्या राज्यांमधील संस्कृतीचे आदान-प्रदान व्हावे, या उद्देशाने ‘सौराष्ट्र तमिळ संगमम’ ही विशेष एक्स्प्रेस गुजरात ते तमिळनाडूदरम्यान सुरू करण्यात आली असून, मंगळवारी दुपारी या विशेष एक्स्प्रेसचे आगमन जळगाव रेल्वेस्टेशनवर झाले. यावेळी जळगाव रेल्वेस्टेशन प्रशासनाकडून ढोल-ताशांच्या गजरात या एक्स्प्रेसचे स्वागत करण्यात आले.

यावेळी स्टेशन प्रबंधक ए. एम. अग्रवाल, प्रमोद साळुंखे, मनीष शर्मा, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह रेल्वेचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या एक्स्प्रेसमधून जाणाऱ्या प्रवाशांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले; तसेच या एक्स्प्रेससोबतच त्यांना या यात्रेबाबत आलेल्या अनुभवांचे अभिप्राय देखील रेल्वेकडून घेण्यात आले. रेल्वे प्रशासनाने ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ उपक्रमाअंतर्गत मदुराई ते द्वारकादरम्यान ही रेल्वे सुरू केली आहे. या रेल्वेला भुसावळ व जळगावला थांबा देण्यात आला आहे. सौराष्ट्रमधील सोमनाथ व तमिळनाडूतील रामेश्वर या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांचा प्रवास चांगला होण्यासाठीही या विशेष एक्स्प्रेसचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे