शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात नववर्षाचे जल्लोषात स्वागत; डीजे, संगीत पथकाने वेधले लक्ष, तरुणाई बेधुंद

By विलास बारी | Updated: January 1, 2024 00:18 IST

प्रत्येकाच्या जीवनातील अनेक घडामोडींसह हे वर्षदेखील पाहता-पाहता सरले, असे म्हणत संध्याकाळी शहरवासीय नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडू लागले.

विलास बारीजळगाव : खास मुंबईहून आलेले संगीत पथक, महिलांचे डीजे पथक व त्यासोबतच स्थानिक संगीत, वाद्याच्या तालावर बेभान होत तरुणाईच्यावतीने २०२३ या सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रंगीबेरंगी फटाके फोडण्यात येऊन हॉटेलमध्ये रॉक बॅण्ड व कपल डान्सने आनंद द्विगुणित झाला होता. गुडबाय २०२३, वेलकम २०२४ असा असा जल्लोष करणाऱ्या तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता.

प्रत्येकाच्या जीवनातील अनेक घडामोडींसह हे वर्षदेखील पाहता-पाहता सरले, असे म्हणत संध्याकाळी शहरवासीय नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडू लागले. यामध्ये अनेकांनी हॉटेलिंगला पसंती दिली तर काही जणांनी घरीच भरीत, शेवभाजीचा बेत आखला होता. कॉलनी भागांमध्ये गच्चीवरही पार्ट्या रंगल्या. त्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर बार, रेस्टॉरंट यांना विशेष सवलत दिली होती. त्यामुळे हॉटेलवरदेखील आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने त्या उजळून निघाल्या होत्या. रात्री आठ वाजेपासून अनेकजण मित्रांसह हॉटेलमध्ये पोहोचले होते. त्या ठिकाणी संगीत, नृत्यावर ठेका धरत तरुणाई बेधुंद झाली होती. कुटुंबीयांचा हॉटेलिंगला पसंती दिल्यामुळे सर्वच हॉटेल्स फुल्ल झाल्या होत्या.

बोचरी थंडी आणि संगीत, मंद प्रकाशात जल्लोष

ग्राहकांच्या स्वागतासह वातावरणात रंगत आणण्यासाठी हॉटेल्सवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. बोचरी थंडी व संगीत, मंद प्रकाश अशा वातावरणात अनेकांनी हॉटेलिंगचा आनंद घेतला. एरव्ही रात्री १० वाजेनंतर रस्त्यांवरील वर्दळ कमी होते; परंतु रविवारी रात्री उशिरापर्यंतही वाहनधारक, पादचाऱ्यांची सारखी वर्दळ रस्त्यांवर होती. रस्ते गर्दीने फुलून गेले होते. काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, नेरी नाका, अजिंठा चौक यासह ठिकठिकाणी पोलिस तैनात होते.

मुंबईचे डीजे पथक खास आकर्षणयंदा थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये जळगावकरांसाठी खास मुंबई येथील महिलाचे डीजे पथक आणले होते. डीजेच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन नृत्य करीत होती. विशेष म्हणजे महिलांसाठी येथे खास व्यवस्था होती. शिवाय अनेकांनी जोडीने येत ‘कपल’ डान्सचा आनंद घेतला. दुसऱ्या एका हॉटेलमध्ये मुंबई येथूनच आणलेल्या संगीत पथकाने जळगावकरांना चांगलेच थिरकवले.

टॅग्स :New Yearनववर्षJalgaonजळगाव