जळगाव : तालुक्यासह शहरात पुन्हा भारनियमन करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आह़े सोमवारपासून भारनियमन तालुक्यात लागू करण्यात आले असून दिवसभरात तिन तासांपासून ते सात तासांर्पयत भारनियमन केले जाणार आह़े विजेचा वाढता वापर, वीज बिलांची थकबाकी आणि वाढत्या वीज चोरीमुळे भारनियमन करण्याचे आदेश प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ त्यानुसार फिडरनिहाय भारनियमन सुरू करण्यात आले असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता एस़एस़ सदामते यांनी सांगितल़े ग्रुप ए ते डी चा समावेश ज्या भागात विजेचा पुरवठा, वापर आणि बिलांचा भरणा सुरळीत आहेत, ते परिसर यापूर्वी भारनियमनातून मुक्त होत़े या भागांची ओळख ग्रुप ए, बी, सी व डी अशी आह़े मात्र सुधारित परिपत्रकानुसार ग्रुप ए, बी, सी व डी मध्ये समाविष्ठ असलेल्या भागांमध्येही भारनियमन करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आह़े यात रिंगरोड, भास्कर मार्केट, फॉरेस्ट कॉलनी, गणपती नगर, शास्त्री टॉवर, भगवान नगर, ओंकारेश्वर मंदिर परिसर, एसएमआयटी परिसर, स्वातंत्र्य चौक, प्रभात कॉलनी, टेलिफोन नगर, शिव कॉलनी, शारदा कॉलनी, गायत्री मंदिर परिसर, गणेश कॉलनी, जी़एस़ ग्राउंड परिसर आणि एस़क़े ऑईल मिल परिसराचा समावेश आह़े दिवसभरात या भागात कमीत-कमी तीन तर जास्तीत-जास्त पाच तास भारनियमन केले जाणार आह़े दोन टप्प्यात हे भारनियमन होईल़ विज चोरी रोखण्यासाठी महिला पथक जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात होत असलेली वीज चोरी रोखण्यासाठी तसेच वसुली वाढविण्यासाठी दामिनी पथकाला समांतर असे महिला पथक तयार केले जाणार आह़े परिमंडळात विभागनिहाय या पथकांची निर्मिती होईल़ वीज मिटर पाहणी आणि कारवाईदेखील या पथकाद्वारे केली जाणार आह़े 10 ऑक्टोबर पासून हे पथक कार्यान्वीत होईल़ 46 कोटीने घटले उद्दिष्टय़ सप्टेंबर 15 मध्ये 151 कोटी रुपये वसुलीचे महावितरणचे उद्दिष्टय़ होत़े मात्र 105 कोटी रुपयांचीच वसुली ग्राहकांकडून होऊ शकली़ 46 कोटी रुपये वसुली कमी झालेली असल्याचे महावितरणचे मुख्य अभियंता ज़ेएम़ पारधी यांनी सांगितल़े तसेच जिल्ह्यातील 70 ते 80 टक्के फिडर भारनियमन कक्षेत आहेत़ संपूर्ण परिमंडळात सूचनेनुसार भारनियमन सुरू करण्यात आले असल्याची माहितीदेखील पारधी यांनी दिली़
तीन ते तेरा तासांपर्यत फिडरनिहाय होणार भारनियमन
By admin | Updated: October 1, 2015 00:24 IST