शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अमळनेरात महिलांसाठी सुरू होणार आठवडे बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 16:25 IST

महिला बचत गट आणि महिला गृहउद्योग यांनी उत्पादित केलेल्या मालाला अथवा ते विक्री करीत असलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महिला आठवडे बाजार सुरू करण्याची संकल्पना मांडली आहे.

ठळक मुद्देमहिला बचतगट व गृहउद्योगांना चालना देण्यासाठी शिरीषदादा मित्रपरिवार व झेप फाऊंडेशनचा उपक्रमप्रथमच ‘महिला आठवडे बाजारा’चा प्रयोग होत असल्याचा दावा

अमळनेर, जि.जळगाव : महिला बचत गट आणि महिला गृहउद्योग यांनी उत्पादित केलेल्या मालाला अथवा ते विक्री करीत असलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी अमळनेरात महिला आठवडे बाजार सुरू करण्याची संकल्पना माजी आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवार व झेप फाऊंडेशन यांनी मांडली आहे. २५ डिसेंबरपासून याचा अमळनेरात शुभारंभ होणार असल्याची माहिती माजी आमदार शिरीष चौधरी व झेप फाऊंडेशनच्या रेखा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला अनिता शिरीष चौधरी यादेखील उपस्थित होत्या. विशेष म्हणजे भारतात प्रथमच अमळनेरात महिला आठवडे बाजाराचा प्रयोग होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या उपक्रमाविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, अमळनेर तालुक्यात अनेक बचत गट व महिला गृहउद्योग असून, काही गट स्वत:चे उत्पादन करतात, तर काही मोठ्या मार्केटमधून वस्तू आणून त्यांची विक्री करीत असतात. परंतु प्रचंड मेहनत घेत असतानाही त्यांना मार्केट व खरेदीदार उपलब्ध होत नसल्याने त्यांना चालना मिळत नाही. यासाठी आम्ही महिला आठवडे बाजार ही संकल्पना तयार केली आहे. त्याचे रजिस्ट्रेशनदेखील केले आहे. हा आठवडे बाजार दर रविवारी शिरीष चौधरी यांच्या स्टेशनरोडवरील इंदुमती निवासस्थानी भरविला जाणार आहे. याठिकाणी महिला बचत गटांना मोफत स्टॉल उपलब्ध करुन दिले जातील. तसेच एखादी महिला स्वत:चा उद्योग घरच्या घरी करीत असेल तिलाही याठिकाणी स्टॉल दिला जाणार आहे. प्रतिसाद जास्त लाभल्यास रोटेशन पद्धतीने प्रत्येक बचतगटास स्टॉल उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, रेखा चौधरी यांनी सांगितले की, बऱ्याच ठिकाणी बचत गटांच्या मालाला मार्केट मिळण्यासाठी प्रदर्शनभरविले जातात. परंतु तेवढ्याने त्यांचे माकेर्टींग होत नाही. त्यांना नियमित मार्केट उपलब्ध व्हावे यासाठी महिला आठवडे बाजाराची संकल्पना आम्ही राबवित आहोत. यात सहभागी होणाऱ्यांना मुंबई, पुणे, नाशिकसारख्या मोठ्या शहरांमध्ये होणाºया भव्य प्रदर्शनामध्येदेखील आम्ही संधी उपलब्ध करुन देणार आहोत. यावेळी गटनेते प्रवीण पाठक, नगरसेक्क नरेंद्र चौधरी, सुनील भामरे, योगराज संदानशिव, अनिल महाजन, धनू महाजन, गुलाब आगळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर