शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

लागवड, फवारणी, पिकांना पाणी देण्यासह हवामानाची माहिती रोबोटकडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बियाण्यांची लागवड, पिकांना खते देणे, औषध फवारणी करणे एवढेच नव्हे तर पिकांना स्वयंचलित पद्धतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बियाण्यांची लागवड, पिकांना खते देणे, औषध फवारणी करणे एवढेच नव्हे तर पिकांना स्वयंचलित पद्धतीने पाणी देणे, अशी शेतीची सारी कामे सहज करणे आता रोबोटच्या माध्यमातून शक्य होणार आहे. ही सर्व कामे करणारा रोबोट सोहेल हमीद कच्छी या विद्यार्थ्याने तयार केला आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रहिवासी असलेला व भुसावळातील श्री संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगणक शाखेत तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या सोहेलला असे नवनवीन प्रयोग करण्याची आवड असून त्यातच हा रोबोट साकारला गेला आहे.

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त उपकरण

कच्छी हा संगणक शाखेचा विद्यार्थी आहे. सॅनिटायझरचे महत्त्व लक्षात घेऊन यापूर्वी त्याने ''ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिस्पेन्सिंग मशीन'' बनवले आहे. कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी याच मशिनच्या धर्तीवर काहीतरी उपयुक्त उपकरण विकसित करावे, हा विचार त्याच्या मनात आला. शेती करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार केल्यावर रोबोटची कल्पना त्याला सुचली. ही कल्पना त्याने प्रत्यक्षात उतरवत शेतीची सर्व कामे करणारा ''ॲग्रोबॉट'' नावाचा एक रोबोट विकसित केला.

उपयुक्त माहिती देणारा रोबोट

सोहेलने ॲग्रोबॉट हा रोबोट अत्यंत कमी खर्चात बनवला आहे. यासाठी त्याने पीव्हीसी पाइपचे तुकडे, खेळण्यातील चाके, ड्राइव्ह मोटारी यासह इतर तत्सम इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल पार्टस तसेच उपकरणांचा वापर केला आहे. हा रोबोट बियाण्यांची लागवड करणे, पिकांना खते देणे, औषध फवारणी करणे, पिकांना स्वयंचलित पद्धतीने पाणी देणे अशी कामे तर करेलच, याशिवाय परिसराचे तापमान, आर्द्रता, हवेचा वेग अशा स्वरुपाची माहितीही शेतकऱ्यांना देईल. हा रोबोट एक प्रायमरी मॉडेल म्हणून विकसित केला आहे. भविष्यात या मॉडेलच्या माध्यमातून शेती उपयोगी यंत्र साकारता येऊ शकते.

रोबोट तयार करताना सोहेलने तंत्रज्ञानाचा अभिनव वापर केला आहे. हा रोबोट एका ॲपच्या माध्यमातून ब्लूटूथ किंवा वायफायद्वारे मोबाइल, लॅपटॉप तसेच संगणकाला कनेक्ट होऊन ऑपरेट करता येतो. ऑपरेट करणारी व्यक्ती लांब रेंजमध्ये असेल तर वायफाय सर्व्हरद्वारे इंटरनेटवरून त्याला कुठूनही ऑपरेट करता येते. रिले इम्प्लिमेंट सर्किटच्या माध्यमातून शेतीला पाणी देणाऱ्या विद्युत मोटारीचे नियंत्रणही हा रोबोट सहज करू शकतो. यूट्यूब, इन्स्टाग्राम अशा साइट्सवरून युवा शेतकरी या रोबोटची कार्यप्रणाली आणि हाताळणी समजून घेऊ शकतात. भविष्यात या रोबोटमध्ये गरजेनुसार अजून अपडेशन करता येईल, असेही सोहलने सांगितले.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत झळकला

वसई येथील विद्यावर्धिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट शोकेस कॉम्पिटिशन नुकतीच घेण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील ३०० संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सोहेलने बनवलेल्या रोबोटने कृषी गटातून पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेत कृषी सोबतच रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्रीज अशा विविध गटात एकाहून एक सरस प्रोजेक्टचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल सोहेलचे हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे. टी. अग्रवाल, सचिव एम. डी. शर्मा, संस्थेचे प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह, अॅकेडमिक डीन डॉ. आर. बी. बारजिभे, कॉम्प्यूटर सायन्सचे विभागप्रमुख डॉ. डी. डी. पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी कौतुक केले.

-------------------

''अ‍ॅग्रोबॉट'' विकसित करण्यामागील माझे ध्येय म्हणजे शेतकर्‍यांना शेतात मदत करणे आणि तरुणांना आपल्या देशासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा देणे. एक जबाबदार तरुण आणि आपल्या देशाचे चांगले उज्ज्वल भविष्य होण्यासाठी माझे प्रयत्न आहे. माझे समर्थन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल माझ्या शिक्षकांचे आणि पालकांचे आभार.

- सोहेल हमीद कच्छी, रोबोट तयार करणारा विद्यार्थी.