शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयतृतीयेला एरंडोलवासीयांची घागर लमांजन तलावाच्या पाण्याने भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 19:31 IST

१८ पैकी १० कि.मी.पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण

एरंडोल : एरंडोल येथे लमांजन पाणी पुरवठा योजनेत १८ पैकी १० कि.मी.पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.सध्या एरंडोल येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जवळपास १० ते १२ दिवसांनी शहरात नगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाई काळात लमांजन पाणीपुरवठा योजना शहरासाठी वरदान ठरणार आहे .या योजनेअंतर्गत १८ किलोमीटर लांबीपैकी १० किलोमीटरपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी दिली आहे.या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून या महिनाअखेर योजनेचे काम पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात आलेले आहे. म्हणून अक्षयतृतीयेला एरंडोलवासीयांची घागर लमांजन तलावाच्या पाण्याने भरणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या एरंडोल येथे जवळपास तीस हात पंप सुरू आहेत. २२ हातपंप प्रस्थावित आहेत. ४० विहिरींचा गाळ काढण्यात यावा, अशी सूचना पुढे येत आहे . तसेच शहरातील २० ते २२ सार्वजनिक सुलभ शौचालयांसाठी नगरपालिकेने विहिरीद्वारे पाणीपुरवठा केला आहे. त्यामुळे पाण्याची बचत होत आहे. अंजनी धरणातील संपुष्टात आलेल्या जलसाठ्यातील पाणी तसेच स्मशानभूमीतील विहिरीचे पाणी घेऊन शहरात पाणीपुरवठा करून नगरपालिका पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. लमांजन योजनेसाठी ८ लाख ७२ हजार रुपये खर्च होईल, अशी अपेक्षा आहे. या योजनेचे काम कधी पूर्ण होणार व या योजनेद्वारे पाणीपुरवठा केव्हा होणार याकडे लक्ष लागून आहे.