शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

डबल मास्क घाला, कोरोना काळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 22:25 IST

तज्ज्ञांचा सल्ला : कोरोना चा धोका ९५ टक्के होतो कमी जळगाव : कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर आता मोठ्या ...

तज्ज्ञांचा सल्ला : कोरोना चा धोका ९५ टक्के होतो कमी

जळगाव : कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात यंदा संसर्ग अधिकच तीव्र असल्याने दुहेरी मास्क वापरण्यास कोरोनाचा धोका ९५ टक्के कमी होतो, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्यामुळे डबल मास वापरा कोरोना टाळा असेच आवाहन सध्या केले जात आहे.गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि आरोग्यविषयक जागॄकतादेखील वाढली. यामध्ये नियमित हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे व मास्कचा वापर करणे या त्रिसूत्रीवर भर दिला जाऊ लागला. यात मास्कचा वापर केल्याने इतरही संसर्गजन्य आजार कमी झाल्याचे वारंवार समोर आले. मास्क वापराविषयी सर्वच पातळीवर जागृती केली जात आहे. मात्र तरीदेखील अनेक जण वापरत नसल्याने प्रशासनाच्यावतीने मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊ लागली. यामुळे मास्क वापराचे प्रमाण वाढले तरी यंदा संसर्गही अधिक पसरत असल्याचे समोर आले.

दुहेरी मास्कचा सल्लागेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कोरोनाचा संसर्ग अधिकच तीव्र असल्याने बाधितांची संख्याही वाढत आहे. शिवाय रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण देखील अधिक वाढण्याचे यावेळी दिसून आले. त्यामुळे या संसर्गापासून बचाव करण्यासाठी दुहेरी मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण - १२३८४४सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - १०३७१होम आयसोलेशनमधील रुग्ण - ६८२३

मास्क कसा वापरावासध्या मास्क तर वापरला जात आहे. मात्र नेमका कोणता मास्क वापरावा याविषयी संभ्रम असतो.  यासंदर्भात डॉक्टरांनी सांगितले की, आरोग्य विषयक कामकाज करणाऱ्या व्यक्तींनी एन-९५ मास्क व त्यावरसर्जिकल मास्क वापरावा. याशिवाय सामान्य नागरिकांनी स्वच्छ धुतलेला कापडी मास्क वापरून त्यावर सर्जिकल मास्क घालावा. एन -९५ मास्क उपलब्ध झाल्यास तो वापरला तरी चालू शकतो. वृद्धांना मास्कचा अधिक वापर केल्यास श्वास घेण्यास त्रास होत असल्यास कापडी मास्क वापरावा, असा सल्ला कान, नाक, घसा विकार तज्ज्ञ डॉ. नितीन विसपुते यांनी दिला.

मास्कविषयी अशी घ्या काळजी

- प्रत्येक वेळी सर्जिकल मास्क नवीन वापरावा- ज्येष्ठ नागरिकांनी घरातही मास्कचा वापर करावा- कापडी अथवा इतर कोणताही मास्क असल्यास तो स्वच्छ ठेवावा.

हे करू नका

- वापरलेला सर्जिकल मास्क दुसऱ्यांदा वापरू नये- एन-९५ अथवा इतर कोणताही मास्कच्यामध्ये स्पर्श होणार नाही, केवळ मास्कची दोरी पकडावी- सर्जिकल मास्क ओला होऊ देऊ नये

टॅग्स :Jalgaonजळगाव