शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही दोघे बहीण भाऊ, गावकारभाराची धुरा वाहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 14:13 IST

खेडगाव अन् खडकीसीम सरपंचपदाला नात्याच्या गुंफणाचा असाही विलक्षण योगायोग पहायला मिळणार आहे.

ठळक मुद्देखेडगाव अन् खडकीसीम सरपंचपदाला नात्याच्या गुंफणाचा असाही विलक्षण योगायोग

संजय हिरेखेडगाव, ता.भडगाव : येथील सरपंचपदी अनुसूचित जमातीसाठीच्या प्रवर्गाच्या निघालेल्या आरक्षणात इकडे सासरी रुपाली गजानन गोकुळ यांची वर्णी लागणार आहे, तर तिकडे माहेरी त्यांचे भाऊ विकास नवल सोनवणे हे एरंडोल तालुक्यातील खडकेसीम (गणेशनगर) येथील याच प्रवर्गाच्या आरक्षणानुसार सरपंच म्हणून गावाची धुरा सांभाळणार आहेत. हा ग्रा. पं. सरपंचपदाच्या निवडीचा विलक्षण योगायोग व एक इतिहास ठरावा.

खेडगाव ग्रा. पं. स्थापनेनंतर मध्यतंरी मालताबाई विजय वाणी यांच्या कार्यकाळात सुभद्राबाई भिल या अनुसूचित जमातीच्या महिलेला २००९-२०१० या वर्षात सरपंचपदाचा मान मिळाला असला तरी तो आरक्षणाव्यतिरिक्त बहाल करण्यात आला होता. ६०-७० वर्षाच्या इतिहासात प्रथमच या प्रवर्गासाठी येथे आरक्षण निघाले हे  विशेष होय. अनुसूचित जमातीसाठीच्या आरक्षणामुळे मात्र येथे सरपंचपदाच्या शर्यतीत असलेल्यांची चांगलीच गोची झाली आहे. सरपंचपदाचे मनोइच्छीत आरक्षण निघण्यासाठी. देव पाण्यात टाकण्यापासून ते सदस्य फुटू नये म्हणुन देवावर पाणी टाकण्यापर्यंत शपथ घेण्याच्या दोन्ही गटाच्या तयारीवर यामुळे पाणी फिरले आहे. याआधी खेडगाव येथे अनुसूचित जाती महिला मनीषा सोनवणे या सलग पाच वर्षे सरपंच होत्या. आता पुन्हा पाच वर्षे स्थिर सरपंच पद एकाच तरुण महिलेकडे राहणार आहे. यामुळे सरपंचपद एक- एक वर्ष वाटून घेण्याची वेळ टळली असली तरी आता उपसरपंचपद मागील पंचवार्षिकीप्रमाणे एक-एक वर्ष वाटत सरपंच नही उपसरपंच तो सही..! या इराद्याने दोन्ही गट मैदानात उतरतात की सहमतीने खुर्चीचा मान राखतात हे येणारा काळच ठरवेल.

अंजनीसुत अन् गिरणाकन्या

अंजनी अन् गिरणेचा नदीजोड प्रमाणेच  दोघे बहीण-भावांच्या नात्याची गुंफण सरपंचपदाच्या खुर्चीला जोडणारी ठरली आहे. रुपाली गोकुळ या डी.एड.पदविका व कला पदवीधारक, तर भाऊ विकास सोनवणे हा कला पदवीधारक व अविवाहीत आहे. त्यांच्या डोक्यावर सरपंचपदाचा चढलेला ताज या कुटुंबासाठी गौरवास्पद असाच आहे. आता हे दोन्ही बहीण-भाऊ आपापल्या गावात गावकारभा-याची भूमिका कशी पार पाडतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  ग्रामपंचायतीत समाजाने मला बिनविरोध निवडून दिले. पुन्हा आरक्षण अनुसूचित जमातीचे निघाल्याने आपसुकच एक पैसा खर्च न करता सरपंचपद मिळाले. याची पावती म्हणून समाजाला व गावाला विकासकामाच्या माध्यमातून आमच्या आडनावाप्रमाणे 'गोकुळ ग्राम’ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.             -रुपाली गजानन गोकुळ, भावी सरपंच, खेडगाव, ता.भडगाव

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBhadgaon भडगाव