शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाझर तलाव आटल्याने जुचंद्रमध्ये पाणीबाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 02:02 IST

मे महिन्यात पाझर तलावात १५ ते २० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे जूनमध्ये पाऊस लांबणीवर पडल्यास जुचंद्रवर पाणीसंकट कोसळण्याची शक्यता आहे.

पारोळ : जुचंद्रकरांची तहान भागवणारा पाझर तलाव यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आटल्याने ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल होण्याची शक्यता आहे. जुचंद्र परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून पाझर तलाव हा एकमेव जलस्रोत पाणीपुरवठ्याबाबत अपुरा पडू लागला आहे. मे महिन्यात पाझर तलावात १५ ते २० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे जूनमध्ये पाऊस लांबणीवर पडल्यास जुचंद्रवर पाणीसंकट कोसळण्याची शक्यता आहे.जूनच्या सुरूवातीला निसर्ग वादळामुळे दोन दिवस पावसाने हजेरी लावली; मात्र त्यानंतर पावसाने आजतागायत दडी मारल्याने पाझर तलाव आटले आहे. जुचंद्रचे पाझर तलाव आटल्याने जुचंद्र, वाकीपाडा, चंद्रपाडा परिसराला पाण्यावाचून हालअपेष्टा सोसाव्या लागणार आहे. पाझर तलाव आटल्याने त्यातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तर जुचंद्र परिसराला सूर्या-धामणी आाण पेल्हार धरणातून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.>कमी दाबाने मिळणार पाणीजुचंद्र परिसराला सूर्या-धामणी आाण पेल्हार धरणातून पाणी पुरवठा करण्यात येणार असला तरी दोन्ही धरणातून होणारा पाणीपुरवठा अनियमित दराने आणि कमी दाबाने होणार आहे.तसेच चंद्रपाडा वा वाकीपाडा येथील पाण्याच्या टाकीत काही दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यादरम्यान पाऊस झाला नाही तर चंद्रपाडा, वाकीपाडा या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.