शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

यावल तालुक्यातील कासारखेडा येथे पाण्यासाठी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 17:03 IST

यावल तालुक्यातील कासारखेडा येथे गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने स्वखर्चाने ३०० फुटापर्यंत बोअरवेल वाढवली, मात्र विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार अशी गत असल्याने आज मात्र ग्रामस्थांना टंचाईशी सामना करावा लागत आहे. तसेच गुराढोरांच्या पाण्याचा प्रश गंभीर हात आहे.

ठळक मुद्देगुराढोरांना पाणी पिण्यासाठी असलेले ढोरकुंड कोरडेठाकदोन महिन्यांपासून होतोय पाण्यासाठी त्रासतीन बोअर करूनही पाणी लागले नाही

यावल, जि.जळगाव : तालुक्यातील कासारखेडा येथे गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने स्वखर्चाने ३०० फुटापर्यंत बोअरवेल वाढवली, मात्र विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार अशी गत असल्याने आज मात्र ग्रामस्थांना टंचाईशी सामना करावा लागत आहे. तसेच गुराढोरांच्या पाण्याचा प्रश गंभीर हात आहे.गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई योजनेंतर्गत २०० फुटापर्यंत दोन बोअरवेल केल्या होत्या. दोन्ही बोअरवेलला पाणी लागले नसल्याने ग्रामपंचायतीने त्यात स्वखर्चाने १०० फुट पुन्हा बोअर केले. तरीही पाणी लागले नाही. गेल्या काही वर्षात तालुक्यातील भूगर्भातील जलपातळी खालावली असल्याने जमीनीत पाणीच नसल्याने दोन्ही बोअर कोरडेठाक पडले आहेत.ग्रामपंचातीच्या मालकीच्या असलेल्या विहिरीचीही पातळी खोल गेल्याने तिला १५० फुटांचे ठेचा बोअर मारले. मात्र काही उपयोग झाला नाही. पुन्हा सरपंच भागवत पाटील यांनी ग्रामपंचायतीकडे अनामत रक्कम ठेऊन विहिरीत ५०० फुटांपर्यंत बोअर केले, मात्र दुर्दैवाने ते बोअर चोकअप झाले. पंचायत समिती, जिल्हा परिषदेने या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष घालून चौदाव्या वित्त आयोगातून हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असे सरपंच भागवत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल