शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

भुसावळात पाणीबाणी, पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 19:25 IST

गेल्या महिनाभरापासून शहराचे पाणी वाटप नियोजन कोलमडले असून, पाणीपुरवठा यंत्रणाच ठप्प झाली आहे. पालिकेच्या या ढिसाळ नियोजनाचा निषेध करुन पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राजू डोंगरदिवे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर महिलांनी हंडा मोर्चा काढला.

ठळक मुद्देप्रांत कार्यालयावर धडकल्या महिलाडोक्यावर हंडे घेऊन मांडल्या व्यथापाणी नसल्याने महिला झाल्या हतबल पाणी वाटप नियोजन कोलमडले

भुसावळ, जि.जळगाव : गेल्या महिनाभरापासून शहराचे पाणी वाटप नियोजन कोलमडले असून, पाणीपुरवठा यंत्रणाच ठप्प झाली आहे. पालिकेच्या या ढिसाळ नियोजनाचा निषेध करुन पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राजू डोंगरदिवे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर महिलांनी हंडा मोर्चा काढला.शहरातील पंचशील नगर, गौतम नगर, गौसिया नगर, गंगाराम प्लॉट, पापा नगर व काझी प्लॉट भागात पालिकेच्या नाकर्तेपणामुळे महिना उलटला तरी पाणी नाही. या भागात गोरगरीब राहात असल्याने ते टँकरही आणू शकत नाही. पाणी नसल्याने महिला हतबल झाल्या आहेत. ‘पाणीबाणी’ची परिस्थिती निर्माण झाली आहे.या भागातील जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. टॅकरवाल्यांचीही मनमानी सुरू आहे. हतनूर धरणात जलसाठा कमी आह,े हे माहीत असूनही शहरातील विंधन विहिरी व विहिरींंचा शोध घेऊन पाणीटंचाई दूर करता आली असती. परंतु सुस्त प्रशासनामुळे या टंचाईचा सामना करावा लागत आहे. आधीच वाढते तापमान, त्यात पाणीटंचाईने जनता व्याकूळ झाली आहे. एक हंडाभर पाण्यासाठी जनतेची धावाधाव सुरू आहे. या गंभीर प्रश्नाची शासनाने दखल घ्यावी या मागणीचे निवेदन मोर्चाद्वारे प्रांत अधिकाº्यांना देण्यात आले. राजू डोंगरदिवे यांच्या नेतृत्वात विक्रम वानखेडे, असगर शेख, आकाश गिरधर, नजीर शहा, पंकज सपकाळे, शहनाज बी, विकास गिरधर, शबानाबी शेख अलियार, आरिफाबी शेख मोहम्मद, सायराबी ईस्माईल, सत्तार बागवान, शबिया बी, जुबेदा बी, रजिया खातून, शेख सलमा शेख रज्जाक यांच्यासह इतरांचा सहभाग होता.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ