शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बाराही महिने १० दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Updated: February 23, 2017 01:15 IST

धरणगाव : सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी नव्याने जलवाहिनी टाकण्याची गरज

धरणगाव : पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वीच्या पाच झोनचे एकेक झोन वाढत जाऊन ते पन्नासपर्यंत पोहोचल्याने धरणगाववासीयांना १० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ही परिस्थिती केवळ आजची नसून, बाराही महिने ही स्थिती कायम असते. यामुळे नागरिक कंटाळले आहेत. नियमित पाणीपुरवठ्यासाठी पालिकेने प्रभावी नियोजन करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.पूर्वीपासून शहरवासीयांच्या नशिबी असलेले पाण्याचे दुर्भिक्ष १४ कोटींची तापी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर तरी कमी होईल, असे वाटत होते. मात्र ही योजना कार्यान्वित झाल्यानंतरसुद्धा पाणी असो वा नसो ‘१० दिवसाआड’ शहराला पाणीपुरवठा होतो. याचे मुख्य कारण म्हणजे शहरातील मुख्य पाच झोनचे गल्लोगल्ली झालेले ५० उपझोन होय. या उपझोनमुळे एका झोनला दोन दिवस पाणीपुरवठा करावा लागतो. पर्यायाने रोटेशन फिरण्यास १० दिवस लागतात. त्यामुळे शहरासाठी नव्याने जलवाहिन्या टाकण्याची नितांत गरज असून यासाठी सुमारे ३० ते ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नूतन नगराध्यक्षांनी मंत्र्यांच्या सहकार्याने हा निधी मंजूर करून घेतल्यास शहराची पाणीपुरवठ्याची समस्या सुटण्यास मदत होणार     आहे.योजना झाली, पण...धरणगाव शहराला १४ कोटींची पाणीपुरवठा योजना १९९८ ला मंजूर झाली होती. या योजनेच्या कामाला १७-१८ वर्षे लोटली गेली. योजना पूर्ण होऊन शहराला पाणीही मिळाले. मात्र ‘जलशुद्धीकरण’ केंद्राचे काम अद्याप रखडलेलेच आहे. तापी योजनेचे अशुद्ध पाणी शहरवासीयांना जादा झोनमुळे १० दिवसाआड मिळत आहे.जलवाहिन्या बदलणे हा एकच पर्याय शहरातील सर्व जुन्या जलवाहिन्या बदलण्यासाठी या योजनेंतर्गत नागपूर येथील ए.डी.सी.सी. कंपनीतर्फे नवीन जलवाहिन्या टाकण्यासंदर्भात सर्व्हे करण्यात आला आहे. जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी सुमारे ३० ते ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित  आहे. या सर्व्हेचा डीपीआर कंपनीने महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे पाठविला असून, जीवन प्राधिकरण इस्टिमेट तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तरच शहरातील पाणी समस्या दूर होणार आहे. यासाठी मतदारसंघाचे मंत्री गुलाबराव पाटील, शहराचे नूतन नगराध्यक्ष सलीम पटेल, उपनगराध्यक्षा सुरेखा विजय महाजन व सर्व नगरसेवकांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे, तरच शहराला नियमित पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. (वार्ताहर)लोकप्रतिनिधींच्या आग्रहावरून वाढले उपझोन४पूर्वी धरणगाव शहरात पाच झोनद्वारे पाणीपुरवठा होत असे. कालांतराने पाच झोनचे लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव उपझोन वाढत गेले अन् वाढता वाढता पन्नासवर उपझोन झाले. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. ४एक झोन व त्याच्या उपझोनला पाणीपुरवठा करण्यास दोन दिवस लागत असल्याने रोटेशन फिरता फिरता १० दिवस उलटून जातात. त्यामुळे शहरवासीयांना १० दिवसाआड पाणी मिळत आहे.४झोन वाढल्यामुळे शहरवासीयांना पाणी मिळण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. अजून फेब्रुवारी सुरू आहे. एप्रिल-मे महिना काढायचा आहे, तेव्हा काय हाल होतील या चिंतेत नागरिक आहेत.धरणगाव शहरातील अंतर्गत जलवाहिन्या बदलविण्यासाठी शासन दरबारी आमचे प्रयत्न सुरू आहेत.           राज्याचे विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न मार्गी लागेल, असा आम्हाला विश्वास आहे. जेणेकरून धरणगाववासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करून         देण्याचे आमचे प्रयत्न               आहेत.-सलीम पटेल, नगराध्यक्ष, धरणगाव