शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी रचले षडयंत्र - भाजपाचे खासदार ए.टी.पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:24 IST

गॉडफादर नसल्याने तिकिट कापले

पारोळा, जि. जळगाव : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी षडयंत्र रचून आपला घात केला. माझ्या हितचिंतकांना सोबत घेत मला संपविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपाचे खासदार ए.टी.पाटील यांनी मंगळवारी पारोळा येथील कार्यकर्त्यांच्या सभेत केला. गेल्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे हे आपले गॉडफादर होते, मात्र या निवडणुकीत कुणीच गॉड फादर नसल्याने तिकीट कापले गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.खासदार पाटील म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून गिरीश महाजन आणि उदय वाघ यांनी ही खेळी रचली होती. ‘कुंपणानेच शेत खाल्ले, दाद मागावी कुणा कडे..’ अशी आपली गत झाली. पक्षाकडे देखील या लोकांनी माझी बदनामी केली. दोन वेळा सर्वेक्षण झाले. त्यावेळी आपले नाव आघाडीवर होते. त्यानंतर मात्र आपल्या सामाजिक बदनामीचा डाव जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उदय वाघ यांनी रचला. पार्लमेंटरी बोर्ड व संघ आपल्या पाठीशी उभा होता. तरीदेखील माझे तिकीट कापले गेले याचे वाईट वाटले. मी जर चुकीचे वागलो असेल, तर भर चौकात फाशी द्या. पण अशी बदनामी करू नका असे आवाहन त्यांनी केले. जळगाव मतदारसंघातील चुकीच्या उमेदवारी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अकाऊंटवर तरुणांनी टिष्ट्वट करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्याकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.दोन दिवसानंतर आपली भूमिका स्पष्टसोमवारपासून मुंबईवरून आपल्याला सारखे फोन करून कोणतीही सभा व मेळावा घेऊ नका असे सांगितले जात होते. मात्र भीक आपण घातली नाही. यांची दादागिरी किती दिवस सहन करायाची असे सांगत दोन दिवसात उमेदवारी बाबत फेर विचार झाला नाही तर मग आपली भूमिका स्पष्ट करू असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Jalgaonजळगाव