शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पाणी व्यवस्थापनाने केली टंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:55 IST

लोहारी बुद्रुकची स्थिती : दहा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा आला पाच दिवसांवर

उत्तम मनगटे।सातगाव डोंगरी, ता. पाचोरा : राज्यात अनेक गावे दुष्काळाने होरपळत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक गावांमध्ये पाण्याची पातळी खालावल्याने जनता व शासन चिंतातूर झाले आहे. मात्र पाण्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन करीत पाचोरा तालुक्यातील लोहारी खुर्द व बुद्रुक ग्रामपंचायतीने टंचाईमुक्त करीत गावाला मुबलक पाणी पुरवठा सुरु केला आहे.लोहारी खुर्द व बुद्रुक गावी ग्रुप ग्रामपंचायत आहे. आदिवासी असलेले आर्वे हे गाव या ग्रामपंचायत अंतर्गत येते. अनेक वर्षांपासून लोहारी गावी बहुळा प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी धरण कोरडे पडले आहे. त्यात थोडेसेच पाणी शिल्लक आहे. गावाला पाणी पुरवठा करणारी विहिर आहे. या धरणाच्या विहिरीतील पाणीसाठा कमी झाला आहे. धरण गावापासून साडेसात किलोमीटर अंतरावर आहे. विहिर कोरडी पडल्याने ग्रा.पं.सह ग्रामस्थ चिंतातुर होते. मात्र सरपंच रंजना पाटील व त्यांचे पती प्रवीण पाटील यांनी गावाला पाणी कमी पडू नये म्हणून अनेकांशी चर्चा करीत कामाला सुरुवात केली. टंचाई आराखड्यातून जेव्हा पैसे मंजूर होईल तेव्हा होईल. मात्र ग्रामस्थांना पाणी उशिरा देता येणार नाही. या भावनेने त्यांनी स्वत:च्या खिशातून चार लाखांच्या दरम्यान खर्च केला. त्यामध्ये नवीन विहिर खोदण्यात आली. ती पुन्हा पंधरा फूट खोल करण्यात आली. विहिरीला तीन आडवे बोअर करण्यात आले. यामुळे मुबलक पाणी मिळाले. तत्पूर्वी धरणाच्या मुख्य नदीत जेसीबीच्या सहाय्याने खोल खड्डा खोदून त्याच्या दीडशे फूट अंतरावर दुसरा खड्डा खोदण्यात आला. त्या दुसऱ्या खड्ड्यात धरणातील असलेले पाणी मोटर पंपाद्वारे टाकण्यात आले. हे पाणी झिरपून यामध्ये काही दिवस तेथून पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र हा उपाय कमी पडत असल्याचे पाहून, नवीन शेवडीला खोल केले. त्यामुळे चांगल्यापैकी पाणी मिळाल्याने गावाला पाचव्या ते सहाव्या दिवशी प्रत्येक व्हॉल्व्हसाठी ४० ते ५० मिनिटे पाणी सोडण्यात येऊ लागले. अनेक ठिकाणी ६३ नवीन व्हॉल्व्ह टाकले. त्यामुळे पाणी गळती थांबली. धरण परिसरात एकूण पाच मोटारी वेगवेगळ्या ठिकाणी बसवलेल्या असून एक ते दीड किलोमीटर धरण परिसरात पाईप फिरविलेले आहे.आर्वे व इंदिरानगर भागासाठी एका शेतकºयाची विहीर अधिग्रहित केली होती. मात्र या जलव्यवस्थापनामुळे पाणी मुबलक असल्याने शासनाचा होणारा अधिग्रहित विहिरीवरचा खर्च वाचला. अधिग्रहित केलेली विहीर रद्द करून तसे पत्र तहसीलदार पाचोरा यांना देण्यात आले आहे. जंगलातल्या विहिरींना पाणी नसल्याने शिवाय या गावात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने, दुधाळ जनावरांना पाणी पिण्यासाठी गावाबाहेर मोठे हौद करण्यात आले.इतकेच नाही तर, विहिरीत पाणी साठा होताच नळाला पाणी सोडले जाते. पाणी सोडण्यापूर्वी स्वत: प्रवीण पाटील पाच दहा मिनिट अगोदरच पाणी सोडण्यात येत असल्याची सूचना देत असतात.सरपंच यांच्यासह सुदेशना संदीप पाटील ग्रामपंचायत सदस्या, रत्नाबाई गजानन झाल्टे, हिराबाई पांडुरंग घुले, चंद्रभागाबाई एकनाथ कोळी, शानूरबाई चांद शहा, सयाबाई नाना भिल, श्रावण रामचंद्र बडगुजर, मुरलीधर त्र्यंबक पाटील यांचे सहकार्य मिळत आहे.ग्रामपंचायतीने केलेल्या उत्कृष्ट जलव्यवस्थापनामुळे सद्यस्थितीला लोहारी खुर्द व बुद्रुक येथील ग्रामस्थांची तहान भागली आहे. त्यांचसोबत विहिर अधिकग्रहणाची शासनाची रक्कम देखील वाचली आहे.