शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे स्वत:च्या शेतातून गावहाळासाठी दिले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 22:41 IST

गावात दरवर्षाप्रमाणे यंदादेखील तीव्र पाणीटंचाई सटीला पुजल्यासारखी जाणवत आहे. माणूस लांबवरून डोक्यावरून पाणी आणू शकतो. मात्र जनावरांना प्यायला पाणीच नसल्याने होणारे हाल पाहून सामाजिक कार्यकर्ते रमेश चिंधा चौधरी यांनी त्यांच्या शेतीसाठीचे पाणी वळवून दत्तमंदिर चौकातील गावहाळ पाण्याने तुडूंब भरला.

ठळक मुद्देहातपंपाचे काम तत्काळ व चांगले केल्याबद्दल ग्रामस्थांतर्फे सत्कारकौतुकास्पद : गुरांच्या पाण्याची सोय झाल्याने पशुपालकांमध्ये समाधानग्रामस्थांची सहनशिलतातहसीलदारांनी भर उन्हात गाठले कळमसरे गाव

घनश्यामदास टाककळमसरे, ता.अमळनेर, जि.जळगाव : गावात दरवर्षाप्रमाणे यंदादेखील तीव्र पाणीटंचाई सटीला पुजल्यासारखी जाणवत आहे. माणूस लांबवरून डोक्यावरून पाणी आणू शकतो. मात्र जनावरांना प्यायला पाणीच नसल्याने होणारे हाल पाहून सामाजिक कार्यकर्ते रमेश चिंधा चौधरी यांनी त्यांच्या शेतीसाठीचे पाणी वळवून दत्तमंदिर चौकातील गावहाळ पाण्याने तुडूंब भरला. हाळात पाणी पाहून गुरंढोरं दूरवरूनच सैरावैरा धावू लागली अन पशुपालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडू लागला.गावात पाणीटंचाई असल्याने नागरिकांच्या पाण्याची सोय तर कशीतरी होत असताना गुरांना पाणी मिळणे खूपच कठीण होते. ही बाब लक्षात घेता रमेश चौधरी यांनी गुरांसाठी पाणी उपलब करुन दिले.तहसीलदारांची धडक कार्यवाहीकळमसरे बसस्थानकाच्या मागील न्यू प्लॉट आदिवासी वसाहतीत २० वर्षापूर्वीचे हातपंप नादुरूस्त असल्याची तक्रार हिरालाल पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्यापर्यत पोहचविली. तेव्हा रखरखत्या उन्हात देवरे यांनी सेवानिवृत्त अनुभवी तांत्रिक कारागिरासह कळमसरे गाठले.दोन्ही हातपंप दुरूस्त होऊन पाणी बाहेर पडेपर्यत देवरे स्वत: ठाण मांडून बसल्या. तत्पर व चांगले काम केल्याबद्दल तहसीलदारांनी त्या निवृत्त तांत्रिक कारागिराचा तर ग्रामस्थांनी तहसीलदार देवरे यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामस्थांनी इतर समस्या मनमोकळेपणाने तहसीलदारांकडे मांडल्या. या समस्यांची लवकरच पूर्तता करण्याचे तहसीलदारांनी आश्वासन दिले.ग्रामस्थांची सहनशिलतासतत अवर्षण प्रवण व डार्क झोनमुळे कळमसरे गावाला तीव्र पाणीटंचाई ही नित्याचीच बाब होऊन लोकांच्या अंगवळणी पडली आहे. २२ दिवसांपर्यत पाणी मिळत नाही तरी परिस्थितीशी जुळवून घेतले जाते.दरम्यान, ग्रामस्थांनी गल्लोगल्ली सामूहिकपणे विंधन विहीर करण्याचा अनोखा प्रयोग करून पाहिला. पण फारसा उपयोग झाला नाही. न्यू प्लॉट वसाहतीत शब्बीर खाटीक हे त्यांच्या विंधन विहीरवरून निम्मे गावास मोफत पाणी पुरवितात तर धरणग्रस्त नवीन पुर्नवसित पाडळसे गाव कळमसरे गावाला पाणी पुरवून मोठे औदार्य दाखवित आहे.मात्र सुमारे पाच हजार लोकवस्तीचे कळमसरे गाव स्वत:च्या हक्काच्या कायमस्वरूपी मुबलक पाणीपुरवठ्यासाठी आतूर आहे. 

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर