शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रामदेववाडी येथे पाणीप्रश्नी धडकला हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 13:03 IST

आॅनलाइन लोकमतशिरसोली, जि. जळगाव, दि. २९ - येथून जवळच असलेल्या रामदेववाडी मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. यावेळी महिलांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात घोषणाबाजी करून आपल्याजवळील पाण्याची मडकी फोडली. तसेच गेल्या ५ दिवसात गावाला पाणी न मिळाल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल असे ...

ठळक मुद्देअन्यथा रास्तारोकोग्रामसेविका रडकुंडीला

आॅनलाइन लोकमतशिरसोली, जि. जळगाव, दि. २९ - येथून जवळच असलेल्या रामदेववाडी मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. यावेळी महिलांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात घोषणाबाजी करून आपल्याजवळील पाण्याची मडकी फोडली. तसेच गेल्या ५ दिवसात गावाला पाणी न मिळाल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, बीडीओ, सीईओ यांना देण्यात आले आहे.जळगाव-पाचोरा रोडवर रामदेववाडी हे गाव वसले असून गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या घरात आहे. या गावात गेले ५ महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कुठलीही पर्यायी सुविधा नसल्याने येथील महिलांना एका हंडाभर पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करावी लागत आहे. या गावातील बहुतांश लोक हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. परंतु गावात पाणीच मिळत नसल्याने पोटाला चिमटा देऊन दोनशे लीटर पाण्याची टाकी ७० रुपयांत विकत घ्यावी लागत आहे. आपली अधिकारी यांना वारंवार कळवून देखील समस्येचे निवारण होत नसल्याने गावातील महिलांनी एल्गार पुकारून ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला होता. यावेळी महिलांनी संताप व्यक्त करीत गावाला ५ ते ६ दिवसात पाणी न मिळाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला असून त्याचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या मोर्चात आप्पा राठोड, बाबुलाल राठोड, हिराबाई पवार, शांतीबाई चव्हाण, जिजाबाई चव्हाण, बसंती जाधव, गिरणाबाई जाधव, यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.ग्रामसेविका रडकुंडीलारामदेववाडीत ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेविका या दोन्हीही महिला असल्याने ग्रामस्थ यांच्याकडे तक्रार घेऊन गेल्यास ग्रामसेविका या तक्रारीचे निवारण न करता रडकुंडीला येतात. यामुळे ग्रामस्थांनी न्याय कुणाकडे मागावा असेही तक्रारीत म्हटले असून ग्रामसेविका व ग्रामपंचायत कारभाराची वरिष्ठांनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे.