आॅनलाईन लोकमतवरणगाव,ता.भुसावळ, दि.३१ : जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी तापीनदीवरील हतनूर धरणातील पाणीसाठा निम्म्या पेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे काही महिन्यातच पाणी संकटाचा सामना करावा लागणार आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या प्रारंभी हतनूर धरणातील पाणीसाठा संपला होता.दरवर्षी प्रमाणे पावसाळ्या नंतर हतनूर धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु धरण पूर्ण भरल्याची आकडेवारी फसवी ठरत आहे.धरणात साठलेल्या गाळामुळे धरणातील पाण्याचा बराचसा भाग गाळाने व्यापला असल्यामुळे वरवर धरण १०० टक्के भरलेले दिसत असल्या वरही प्रत्यक्षात पाणीसाठा ३० टक्क्याहूनही कमीच असतो. मार्च महिन्याच्या मध्यातच हतनूर धरणातील पाणी साठा ४५ टक्क्यावर आला आहे. त्यामुळे कृषी सिंचन आणि धरणावर अवलंबून पाणी पुरवठा योजनेसह औद्योगिक प्रकल्पांना पाणी संकटाचा मोठा सामना करावा लागेल, अशी सध्याची स्थिती आहे.हतनूर धरणातील साचलेल्या गाळाचे सर्वेक्षण ‘मेरी’ने २००७ साली केले होते. त्यावेळीच धरणात सुमारे २० टक्के गाळ साचला होता. त्यानंतर १५ वर्ष उलटून गेली आहेत. धरणात प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याने पाणी साठ्याची क्षमता घटली आहे. परंतु धरणातील गाळ काढण्याबाबत शासनाचा पाटबंधारे विभाग उदासिन असल्याने भुसावळ संकटाची स्थिती निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.उपसा योजनेव्दारे तापी नदीतून वाहून जाणारे पुराचे पाणी ओझरखेडा साठवण तलावात साठविण्यासाठी उपसा योजना पूर्णत्वास आली आहे. त्या योजनेची चाचणी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. त्या चाचणीत धरणातील १.८ दशलक्ष पाणी वाया गेले. ही चाचणी पावसाळ्यात घेणे अपेक्षित असताना ती हिवाळ्यात घेण्यात आल्याने धरणातील पाणीसाठा घटण्यास कारणीभूत ठरत आहे.हतनूर धरणावर पिण्याच्या पाण्यासाठी आणि उद्योगासाठी अवलंबून असलेले महत्त्वाचे उद्योग वरणगाव आणि भुसावळ आॅर्डनन्स फॅक्टरी, दीपनगर वीज निर्मिती प्रकल्प, भुसावळ रेल्वे यासह लष्कर डेपो आणि विविध ठिकाणच्या पाणी पुरवठा योजना, भुसावळ शहर या सर्वांना जास्त पाणी लागते.
हतनूरमधील साठा निम्म्यावर भुसावळ परिसरावर पाणी संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 16:20 IST
सिंचनासह भुसावळ तालुक्यातील पाणी योजना येणार अडचणीत
हतनूरमधील साठा निम्म्यावर भुसावळ परिसरावर पाणी संकट
ठळक मुद्देमागील वर्षी जून महिन्याच्या प्रारंभी हतनूर धरणातील पाणीसाठा संपला होतामार्च महिन्याच्या मध्यातच हतनूर धरणातील पाणी साठा ४५ टक्क्यावरधरणातील चाचणीत गेले १.८ दशलक्ष पाणी वाया