शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यात ट्रॅक्टर धुताना युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 17:50 IST

चिंचोल, चांगदेव, मेहुण गावात पोळा सण नाही झाला साजरा

मुक्ताईनगर, जि.जळगाव : पोळ्याच्या दिवशी ट्रॅक्टर धुताना तापी नदीच्या बॅकवॉटरमध्ये बुडाल्याने युवकाचा मृत्यू झाला. अशिकेत अनिल चौधरी (वय २८, रा.चिंचोल, ता.मुक्ताईनगर) असे या युवकाचे नाव आहे. चिंचोल येथे रविवारी सकाळी आठ ते दहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. यामुळे चिंचोल या गावासोबतच परिसरातील चांगदेव व मेहुण या गावांमध्ये आज पोळा सण साजरा झाला नाही.तालुक्यातील चिंचोल येथील अशिकेत अनिल चौधरी हा युवक पोळ्याच्या दिवशी सकाळी आठ ते दहा वाजेच्या सुमारास तापी नदीच्या बॅकवॉटरमध्ये ट्रॅक्टर धुण्यासाठी गेला. तेव्हा पाय घसरून पडल्याने तो पाण्यात बुडाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. दोन तासापर्यंत ट्रॅक्टर घेऊन गेलेला अशिकेत हा घरी परत आला नाही म्हणून शोधाशोध केल्यानंतर ट्रॅक्टर पाण्याच्या काठावर उभे असलेले दिसले. तेव्हा संशय आल्याने पाण्यात उडी मारून पाहिले असता त्यात अशिकेत याचा त्याचा मृतदेह आढळून आला आणि ही घटना उघडकीस आली.पोळ्याच्या दिवशी काळाने घाला घातल्याने केवळ चिंचोल गावावरच नव्हे तर परिसरातील चांगदेव व मेहुण या तीन गावांमध्ये पोळा हा सण साजरा करण्यात आला नाही. अशिकेतचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. तसेच त्याचे डीएड शिक्षण झाले होते. परंतु घरी शेतीत वडिलांना मदत व्हावी म्हणून अशिकेतने नोकरी न करता घरीच राहून शेती सांभाळण्याचा निर्णय घेतलेला होता.अतिशय हसतमुख, मनमिळावू स्वभावाच्या अशिकेटच्या मृत्यूची घटना सकाळी दहा वाजेला उघडकीस असल्याने संपूर्ण चांगदेव चिंचोल मेहुण या तीन गावांच्या परिसरामध्ये नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या तीनही गावात गुजर समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने व समाजातील युवकाचे निधन झाल्याने तीनही गावात पोळा फुटला नाही.अनिकेतच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ-बहीण असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर