शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

हमी भाव जाहीर झाले, ते पदरी पडतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 12:05 IST

शेतकऱ्यांचा सवाल

जळगाव : केंद्र सरकारने खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत जाहीर केली असली तरी ती कधीही मिळालेली नाही. वर्षानुवर्षापासून असेच सुरू असल्याने त्या बाबत शाश्वती नाही. त्यामुळे यंदाही हमी भाव जाहीर झाले असले तरी ते पदरी पडतील की नाही, असा सवाल शेतकरी, शेतकरी संघटनांकडून व्यक्त केला जात आहे.केंद्र सरकारने २०१९-२० या वर्षासाठी खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत जाहीर केली. यात तेलबिया व्यतिरिक्त सर्व पिकांची किंमत ही प्रतिक्विंटल ६० ते २०० रुपये वाढ झाली. १९६६-६७ पासून आतापर्यंत साधारणपणे दरवर्षी २ ते ३ टक्केच वाढ देण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्या तुलनेत दरवर्षी रासायनिक खते, वीज, वाहतूक मजुरीचे दर वर्षाला किमान १० ते १५ टक्के वाढत आहेत. यात घट कधीच झाली नाही. म्हणजेच दरवर्षी १० ते १२ टक्के उत्पादन खर्च हा किमान आधारभूत किंमत पेक्षा जास्त होत आहे व शेती ही तोट्यात जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले. तरी कृषी मंत्री उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के भाव जास्त जाहीर केला, असे म्हणत असले तरी ही बाब खोटी तर आहेच, सोबतच शेतकºयांचा अपमान करणारीदेखील असल्याचा आरोप या निमित्ताने केला जात आहे.हमी अंमलबजावणी होणे गरजेचेसरकारने शेतकºयांचे उत्पादन दुप्पट करण्याची योजना म्हणून हे भाव जाहीर केले. मात्र या हमी भावांची अंमलबजावणी होत नाही, हे दु:ख असल्याचाही सूर शेतकरी, व्यापाºयांमधून आहे. सरकार एकीकडे हमी भाव जाहीर करते व दुसरीकडे विदेशातून मालाची आयात करते. त्यामुळे शेतीमाला भाव कसा मिळू शकतो, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.शेतमालास उत्पादन खर्चावर आधारीत ५० ते २०० टक्के नफा देऊन भाव जाहीर केल्याचे कृषिमंत्री सांगत असले तरी हा शेतकºयांचा विश्वासघात केला आहे. शेतकºयांनी ज्या विश्वासार्हतेने भाजप सरकारला निवडून दिले त्यांनीच शेतकºयांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक केली आहे. सोबतच ज्यांना शेती कळत नाही त्यांच्या मनात शेतकºयाविषयी गैरसमज पसरविण्याच प्रकार आहे.- एस. बी. पाटील, सदस्य, शेतकरी सुकाणू समिती.सरकार हमी भाव वाढवून देते, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो. दीर्घ काळाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. मात्र जाहीर झालेला हमी भाव शेतकºयास मिळाला पाहिजे. दरवर्षी त्यापेक्षाही भाव कमी मिळतात. त्यासाठी बाजारपेठ व जाहीर हमी भाव यांची योग्य सांगड घातली गेली पाहिजे.- प्रेम कोगटा, डाळ उद्योजक.हमी भाव जाहीर होतात. मात्र बाजारपेठेत प्रत्यक्ष हे भाव पोहचत नाही. त्यामुळे व्यापाºयांनाही त्रास होतो. याकडे सरकारने लक्ष द्यावे.- शशी बियाणी, व्यापारी.एकीकडे हमी भाव जाहीर होत असले तरी बाजारपेठेतील तफावत पाहता शेतकºयांना तेवढा भाव मिळत नाही. यात बºयाच वेळा व्यापाºयांनाही नुकसान सहन करावे लागते. योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.- संजय शहा, व्यापारी.गेल्या अनेक वर्षांपासूनचा अनुभव पाहता हमी भाव जाहीर झाले तरी ते शेतकºयांना मिळत नाही. बाजारपेठेतील भावाशी त्याचा ताळमेळ असावा. तरच शेतकºयांना त्याचा लाभ होईल.- स्वप्नील चौधरी, शेतकरी.हमी भाव जाहीर झाल्यानंतर त्याच भावात शेतीमाल खरेदी होण्यासाठी यंत्रणा असावी. तरच त्याचा लाभ होऊ शकेल. फळ पिकांबाबतही विचार होणे गरजेचे आहे.- डॉ. सत्वशील जाधव, शेतकरी.

टॅग्स :Jalgaonजळगाव