शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पारोळ्यात महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 14:58 IST

जोरदार स्वागर पारोळ्यात प्रवेश करताना मोंढले प्र.अ. येथे स्वागत करण्यात आले. तसेच पारोळा जलशुद्धीकरण केंद्राजवळून फडणवीस यांच्या स्वागताला ५०० मोटारसायकलींसह भव्य रॅली काढण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण दिल्याने समाजाच्या व नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष करण पाटील यांनी स्वागत केले. बालाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून संस्थेचे अध्यक्ष यू.एच.करोडपती, मुख्याध्यापक हेमंत पाटील, विजय बडगुजर आदींनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे फुगे व फुले उधळून स्वागत केले. माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी फटकांची आतषबाजी केली.

पारोळा (जि. जळगाव) : पंधरा वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जो विकास केला नाही तो पाच वर्षांत भाजपच्या सरकारने सर्व क्षेत्रात साधला आणि जो विकास साधला तो जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपने महाजनादेश यात्रा काढली. पुढे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मला तसेच पालकमंत्री गिरीश महाजन आणि नगराध्यक्ष करण पाटील यांना आशीर्वाद द्यावेत, असे आहवान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.पारोळा-अमळनेर रोडवर खुल्या पटांगणावर शुक्रवारी दुपारी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना त्यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी ते म्हणाले की, पारोळा शहराला नव्याने बोरी धरणातून पिण्याच्या पाण्याचे आरक्षण दिले. तसेच यापुढेही शहराला पाणी अपूर्ण पडू दिले जाणार नाही. शेतकरी कर्जमाफी दिली. मराठा आरक्षण आजपर्यंत कोणी दिले नाही, ते या युती शासनाने दिले. पाच वर्षांत ४० लाख परिवारांना बचत गटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिले. जनता ही दैवत आहे, अशी भावना व्यक्त करीत नव्याने भाजपाला जनादेश द्याल का, असा प्रश्न विचारीत पुन्हा आम्हला आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले.या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, नगराध्यक्ष करण पाटील, आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, शिक्षण सभापती पोपट भोळे, माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर, सभापती नंदू महाजन, सुरेंद्र बोहरा, अ‍ॅड.अतुल मोरे, मनोहर महाजन, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब पाटील, सभापती अंजली पवार, दीपक अनुष्ठान, पंचायत समिती सदस्या सुजाता पाटील, वर्षा पाटील, पी.जी.पाटील, संजय पाटील, राजेंद्र पाटील, गटनेते बापू महाजन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. शैलेश पाटील यांनी केले.