शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नॉन कोविड रूग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘वॉर रूम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 20:04 IST

जळगाव : नेमके कुठल्या रूग्णालयात सुविधा आहे, याबाबत पुरेशी माहिती मिळत नसल्यामुळे नॉन कोविड अर्थात कोविड आजारशिवाय अन्य आजार ...

जळगाव : नेमके कुठल्या रूग्णालयात सुविधा आहे, याबाबत पुरेशी माहिती मिळत नसल्यामुळे नॉन कोविड अर्थात कोविड आजारशिवाय अन्य आजार असलेल्या रूग्णांची एका रूग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयात धावळ होत असते. आता ही धावपळ थांबावी व रूग्णाला योग्य उपचार आणि माहिती मिळावी, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने जिल्हा परिषदमध्ये ‘वॉर रूम’ची स्थापना केली आहे़ तर ०२५७-२२२४२६८ या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर नॉन कोविड रूग्णांना संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रूग्णालयाचे कोविड रूग्णालयात आलेले आहे़ तसेच काही खाजगी रूग्णालये देखील कोविड रूग्णांकरीता अधिग्रहीत करण्यात आले आहेत.अशा परिस्थितीत कोविड आजाराशिवाय अन्य व्याधी व आजार असलेल्या रूग्णांच्या उपचार व सोयी करीता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ३३ रूग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेद्वारे सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे़ सदर रूग्णालयांच्या नावाची यादी देखील उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु, काही वेळा अन्य आजाराच्या रूग्णांना याबाबत पुरेशी माहिती मिळत नसल्याने आरोग्य सुविधा उपलब्ध असलेल्या नेमक्या त्या रूग्णालयात न जाता रूग्णांची इतरत्र म्हणजेच या रूग्णालयातून दुस-या रूग्णालयात फिरफिर होत असते़ त्यातच कोणत्या आजारासाठी कोणत्या रूग्णालयात सुविधा उपलब्ध आहेत़ तेथील बेडस् उपलब्धतता व इतर तत्सम उपकरणांची उपलब्धतता आदींची माहिती अभावामुळे रूग्णांचे हाल होतात़ यावर उपाययोजना म्हणून व रूग्णांना घरातून निघतांनाच कोणत्या आजारासाठी कोणत्या रूग्णालयात जावे व तेथे खाटाची उपलब्धतता समजवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने बेडस् अव्हॅलिबिटी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट सिस्टीम ही आॅनलाईन प्रणाली यापूर्वी सुरू केली आहे.वॉर रूम २४ तास कार्यान्वितनॉन कोविड रूग्णांची होणारी धावपळ थांबविण्यासाठी व त्यांना वेळेत उपचार उपलब्ध व्हावे या करीता जिल्हाधिकारी व जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदमध्ये वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे़ वॉर रूम ही आवठड्यातील सात दिवस पूर्ण २४ तास कार्यान्वित असणार आहे़ कक्षाचा संपर्क क्रमांक हा ०२५७-२२२४२६८ असा आहे़ तसेच वॉर रूम नोडल आॅफिसर जिल्हा विशेष लेखापरिक्षक आऱबी़जंगले यांची नेमणूक करण्यात आली आहे.संपर्क साधल्यास ही मिळणार माहितीवॉर रूम कक्षाच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर नॉन कोविड रूग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ठ रूग्णालयांची नावे, तेथील उपलब्ध उपचारांची व्यवस्था, खाटांची उपलब्धता आदी बाबींची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव