शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराविरूद्ध लढा तरीही अजामिनपात्र वॉरंट काढून होतोय छळ : अंजली दमानिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 17:43 IST

रावेर न्यायालाने केला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जामीन मंजूर

ठळक मुद्देमुंबई उच्च न्यायालयाच्या हमदस्तच्या आदेशाची प्रतिलिपी पाकीटात न टाकण्याचे तांत्रिक त्रुटीमुळे हजर न राहण्याबाबत झाला घोळरावेर न्यायालयात पक्षकार, वकील व शिवसैनिकांची गर्दीदोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने मंजूर केला जामीन

आॅनलाईन लोकमतरावेर, दि.१६ - आपण कुणी गुंड किंवा मवाली नाही. भ्रष्टाचाराविरूद्ध लढा देणारी कार्यकर्ता आहोत. कर्करोगाने त्रस्त असताना तब्बल १० तास प्रवास करीत आहोत. मात्र तरीही मुद्दाम दोन-दोन वेळा अजामिनपात्र वॉरंट काढून आपला छळ केला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी रावेर येथ केला.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी दाखल झालेल्या फौजदारी खटल्यात रावेर न्यायालयाने बजावलेले अटक वॉरंट रद्द करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्या.दिलीप मालवीय यांच्या न्यायासनासमोर हजर होवून स्वत: तब्बल अर्धा ते पाऊण तास युक्तिवाद केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या हमदस्तच्या आदेशाची प्रतिलिपी पाकीटात न टाकण्याचे तांत्रिक त्रुटीमुळे हजर न राहण्याबाबत घोळ झाल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मी कोणी गुंड, मवाली नसून वा कोणता खून वा चोरी केली नसून भ्रष्टाचाराविरूध्द लढा देणारी कार्यकर्ता आहे. ज्या खडसेंनी मंत्री पदाचा गैरवापर वापर करून संपत्ती जमवली त्यांच्याविरूद्ध खंबीरपणे लढा देत आहे. मला मुद्दाम दोनदा अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. कर्करोगाने ग्रस्त असतांना तब्बल १० - १० तासांचा प्रवास करून का म्हणून मानसिक व शारीरिकदृष्ट्या छळण्यात येते? असा मानसिक त्रागा अंजली दमानिया यांनी व्यक्त केला. तसेच वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्याची विनंती केली. रावेर न्यायालयाने फियार्दी पक्षाचे म्हणणे ऐकून घेत अंजली दमानिया यांचा जामीन मंजूर करीत असल्याचे आदेश पारीत केले. यावेळी रावेर न्यायालयात पक्षकार वकील व शिवसैनिकांनी खच्चून गर्दी केली होती. त्यांचेसमवेत मुंबई येथून त्यांचे दीर आणि भावजयी, जळगाव येथील शिवसेनेचे गजानन मालपूरे, वकील अ‍ॅड सुधीर कुलकर्णी, रावेर शिवसेना जिल्हाउपप्रमुख प्रल्हाद महाजन, तालूका प्रमुख योगिराज पाटील, शहरप्रमुख नितीन महाजन, अशोक शिंदे, गोपाळ मिस्तरी, हर्षल बेलस्कर, अ‍ॅड.जे.जी.पाटील उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonजळगावRaverरावेर