शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पाचोरा येथे कोर्ट फी तिकिटांसाठी होतेय भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 14:42 IST

जिल्हा कोषागार कार्यालयातून पाच, तीन आणि दोन रुपयांच्या स्टॅम्पच्या अनियमित पुरवठ्यामुळे कोर्ट फी तिकिटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या मार्च महिन्यांपासून पुरवठा होत नसल्याने नागरिकांना या तिकिटांसाठी पाचोरा तहसील कार्यालय परिसरात भटकंती करावे लागत आहे.

ठळक मुद्दे२, ३, ५ रुपयांच्या कोर्ट तिकिटांचा पाचोरा येथे तुटवडानागरिक हैराण

खडकदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव : जिल्हा कोषागार कार्यालयातून पाच, तीन आणि दोन रुपयांच्या स्टॅम्पच्या अनियमित पुरवठ्यामुळे कोर्ट फी तिकिटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या मार्च महिन्यांपासून पुरवठा होत नसल्याने नागरिकांना या तिकिटांसाठी पाचोरा तहसील कार्यालय परिसरात भटकंती करावे लागत आहे.या तिकिटांसाठी शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच वकील, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.न्यायालयात वॉरंट रद्द करणे, जामीन, गैरहजेरी अर्ज, जातमुचलक्याचा अर्ज, माहिती अधिकाराचा अर्ज, निबंधक कार्यालय आदी कामांसाठी कोर्ट फी तिकीट लावणे बंधनकारक असते. याचा पुरवठा जिल्हा कोषागार कार्यालयातून करण्यात येतो. या तिकिटांचा पुरवठाच झाला नसल्याने ही तिकिटे विक्रीला उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्याने नाहक नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागतो आहे. कारण दोन, तीन, पाच रुपयांची तिकिटे उपलब्ध नसल्याने नागरिकांना १० व २० रुपयांची तिकिटे लावावी लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.या पार्श्वभूमीवर, कोषागार कार्यालयाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देवून कोर्ट फी तिकिटे तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.पाचोरा कोषागार कार्यालयाशी संपर्क साधला असता जिल्हा कार्यालयाकडूनच या तिकिटांचा पुरवठा होत नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Courtन्यायालयPachoraपाचोरा