शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार सोडून पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 16:54 IST

गत वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. केवळ बोदवड शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात ही स्थिती कायम आहे. ओडीएच्या योजनेला पाणी येते त्या दिवशी तर लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण रोजगार सोडून पाण्यासाठी भटकंती करताना दिसतात. हे नेहमीचेच चित्र आहे.

ठळक मुद्देबोदवड तालुक्यातील चित्रतालुक्यात पाण्यासाठी दाही दिशाझोपडपट्टी भागात तर भयावह स्थितीपाणी रे पाणी तेरा रंग कैसा

बोदवड, जि.जळगाव : गत वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. केवळ बोदवड शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात ही स्थिती कायम आहे. ओडीएच्या योजनेला पाणी येते त्या दिवशी तर लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण रोजगार सोडून पाण्यासाठी भटकंती करताना दिसतात. हे नेहमीचेच चित्र आहे.अवर्षणग्रस्त तालुका अशी ओळख असलेल्या बोदवड तालुक्यात घोटभर पाण्यासाठी मैलभर फिरण्याचे दृश्य नित्याचेच झाले आहे. एकमेव ओडीएच्या पाण्यावर लाईफ लाईन जिवंत असून, ज्या दिवशी ओडीएच्या पाईप लाईनला पाणी येते त्या दिवशी, तालुक्यात पाण्यासाठी लहान सहान बालकासह बाया बापडे दिवसभर रोजगार सोडून उन्हा-तान्हात पाण्याचे चेंबर तसेच पाण्याच्या व्हॉल्वमधून थेंब थेंब पाणी गोळा करून घेतात व मैला मैलाची पायपीट करून वाहतूक करतात, तर काही ठिकाणी बैलगाडीने पाणी वाहतूक करून रानाशेतातून आणावे लागत आहे.आजच्या स्थितीत तालुक्यातील जामठी, एणगाव, शेलवड, बोदवड, नाडगाव, राजूर ह्या गावात भीषण पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी रोजगारावर पाणी फिरवून मुलांना छटाकभर जीव आणि किलोभर पाण्याचे ओझे डोक्यावर घेऊन ही पायपिट करावी लागण्याचे चित्र पहावयास मिळते. त्यांना कोणत्याच राजकारणाशी काहीही घेणे नाही. बस पिण्याला पाणी मिळाले पाहिजे, अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे.नाडगाव येथील पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था पाहता बोदवड येथील काही समाजसेवकांनी एकत्र येत पिण्याच्या पाण्याचे टँकर गावात पाठवले असून, प्रभाग क्रमांक दोनमध्ये पाण्यासाठी टँकरसमोर लांब रांगा लागल्या होत्या. त्यांनी टँकरने पाणी पुरवणाऱ्या समाजसेवींचे आभारही व्यक्त केले. सदर यासाठी जितेंद्र झांबड, उमेश चोपडा, विनय बाफना या तरुणांनी पुढाकार घेतला आहे, तर ग्रामस्थ त्यांचे आभार व्यक्त करीत आहे.तर पाणीटंचाईबाबत विरोधी गट नेता देवेंद्र खेवलकर यांची प्रतिक्रिया घेतली असता शहरातील सर्व विहिरींनी नोव्हेंबर महिन्यातच तळ गाठला आहे. फक्त ओडीएच्या भरवशावर शहर व तालुक्यातील लाभ घेणाऱ्या गावांची तहान भागत आहे, तर सत्ताधारी पक्षांनी योजना मार्गी लावली असती तर ही अवस्था राहिली नसती.अशीच परिस्थिती बोदवड शहरातील झोपडपट्टी भाग, इंदिरा नगर प्लॉट परिसरात आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBodwadबोदवड