वरखेडी, ता.पाचोरा- येथे माणिकपुरा भागातील रहिवासी भगवान जंगलू लोणारी यांच्या राहत्या घराची भिंत सततच्या पावसामुळे अचानक रविवारी सायंकाळी कोसळली. या भिंतीत पाणी मुरून तडा गेला होता. या भिंतीलगतच्या रस्त्यावर सतत वर्दळ असते. मात्र यातून कोणतीही जीवित हानी झाली नाही.
पावसाने कोसळली भिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 20:30 IST