शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वाकोद परिसरात जा रे जा पावसा म्हणण्याची आली वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 16:21 IST

वाकोदसह परिसरातील शेतकरी वर्ग मुसळधार अवकाळी पावसाने मेटाकुटीला आला आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम पूर्ण पणे वाया गेला आहे.पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे़. -गणेश भील, शेतकरी, वाकोद

अर्पण लोढावाकोद, ता.जामनेर, जि.जळगाव : वाकोदसह परिसरातील शेतकरी वर्ग मुसळधार अवकाळी पावसाने मेटाकुटीला आला आहे. गेल्या सलग तीन वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसलेल्या शेतकऱ्यांना यंदा ओल्या दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली आहे. मका, सोयाबीन, कापूस, बाजरी, ज्वारी, तूर आदी पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस दररोज हजेरी लावत आहे. त्याचा पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे खरीप हंगाम पूर्ण पणे वाया गेला आहे.या हंगामात सुरूवातीपासून पावसाने विलंब जरी केलेला असला तरी सतत पावसाचे प्रमाण चांगले असल्याने यंदा पिकांची स्थिती उत्तम होती. अधूनमधून बरसणाºया रिमझिम पावसाच्या भरवशावर बळीराजाने मोठ्या हिमतीने तडजोड करीत पैसा लावून पीके घेण्याचा प्रयत्न केला़ मात्र हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात येवून हातातोडांशी आलेला घास हिरावला आहे़ काही तरी पदरात पडेल म्हणून आशेवर बसलेल्या बळीराजाचा पुन्हा एकदा बळी गेला आहे़ दरवर्षी होणाºया नुकसानीमुळे व नापिकीमुळे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मका पिकांची लाणी केली असून खाली पडलेल्या कंसाची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली मकाच्या कंसाना मोठ मोठी कोबंटे फुटलेली आहे. तर कापूस फुटलेली बोंड पाण्याने खराब झालेले आहे तसेच काही ठिकाणी कापसातील सरकीला देखील कोबंटे फुटले असल्याने कापुस पिक देखील हातातून जाताना दिसत आहे. तर काही ठिकाणी पिके कुजत चालली आहे त्यातच सततच्या पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. तसेच जनावराचा चारा वाया गेला आहे. चाºयाचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे शेतकºयाचे कबंरडे मोडले आहे. वरूणराजा आता तरी थांब म्हणण्याची वेळ सर्वावर आली आहे. बियाण्यासह खते, फवारणी, रोजंदारी साठी झालेला हजारो रुपये खर्चही निघणे अवघड झाले आहे.अहोरात्र मेहनत घेऊन शेतातील पिके वाचविण्यासाठी व लागलेला खर्च काढण्यासाठी प्रयत्न केला़ मात्र या झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने हाती आलेले उत्पन्न हिरावून घेतले आहे़ शेतातील मका, कापुस पूर्ण खराब झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे़.-गणेश भील, शेतकरी, वाकोदसततच्या होणाºया अवकाळी पावसामुळे मका कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढलेल्या मक्याच्या कणसांना जागेवर मोड आल्याने नुकसान झाले आहे. कपाशीची बोंडे सडण्यास सुरुवात झाली आहे. त्वरित पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी.-ईश्वर कोळी, शेतकरी, कुंभारी तांडा, ता.जामनेर 

टॅग्स :RainपाऊसJamnerजामनेर