शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कैरी बाजारालाही पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 12:32 IST

तीन आठवडे उलटूनही हवी तशी मागणी नाही

जळगाव : पावसाने दडी मारल्याचे परिणाम सर्वच घटकांवर जाणवताना दिसत आहे़ लोणच्याच्या कैऱ्या बाजारात दाखल झाल्या आहेत मात्र, पाऊस नसल्याने या कैऱ्यांना हवी तशी मागणीच नसल्याचे कैरी विक्रेत्यांनी सांगितले़ शनिवारी जळगावात आठवडे बाजारात छोट्या मोठ्या अशा सुमारे दोनशे कैरी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती, मात्र फारसी ग्राहकीच नसल्याचे चित्र होते.जून महिन्याचा शेवटचा आठवड उजाडत असला तरी पावसाने हजेरी लावलेली नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे़ गेल्या वर्षीच्या कमी पर्जन्यामुळे आधीच पाणी संकट बिकट झाले असून पावसाला होणारा विलंब अनेक समस्यांना आमंत्रण देत असल्याचे चित्र आहे़ दरवर्षी साधारण पहिला पाऊस पडल्यानंतर गृहीणींचा ओढा लोणचे टाकण्याकडे असतो़ मात्र यंदा पाऊस लांबल्यामुळे हे नियोजनही कोलमडल्याचे चित्र आहे़ शनिवारच्या बाजारात सकाळी साडे अकराच्या सुमारास काही प्रमाणात गर्दी पाहायवयास मिळाली़ सकाळपासूनच सात ते आठ टेप्मो व अन्य छोटे छोटे विक्रेते कैºया विक्री करीत होते़ एका वाहनात साधारण तीन ते चार टन कैºया असतात,अशा किमान सहा ते सात वाहने कैºयांची विक्री म्हणजेच वीस ते तीस टन कैºयांची शनिवारच्या बाजारात विक्री होईल, असा अंदाज काही विक्रेत्यांनी वर्तविला़ यापेक्षा पुढील शनिवारी अधिक उलाढाल होण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे़ २५ ते ४० रूपये किलोपर्यंत कैºयांची विक्री होत आहे़ यासह लोणच्यासाठी लागणारे अन्य साहित्य विक्रीची लगबग वाढली आहे़कैºयांचे विविध प्रकार बाजारात उपलब्धराजापुरी, सरदार, वनराज असे विविध कैºयांचे प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत़ यात सरदार व राजापुरीला सर्वाधिक मागणी असल्याचे धरणगाव येथून आलेले कैरी विक्रेते लक्ष्मण भोई यांनी सांगितले़ राजापूरी २५ रूपये किलो तर सरदार कैरी ३० रूपये किलोप्रमाणे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले़ कैºयांची आवक ही गुजरात राज्यातून होत असते़ तर आपण गेल्या तीन आठवड्यांपासून दुकान थाटत आहोत मात्र, यंदा पाऊस नसल्याने हवी तशी मागणी नसल्याचे विक्रेते भीवा भोई यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव