शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष रुग्णसेवेसाठी सिटीस्कॅनची अद्यापही प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 12:28 IST

उद्घाटन झाले, तपासणी मात्र नाही

ठळक मुद्देचाचणी व इतर प्रक्रिया बाकीरुग्णांकडून विचारणा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15 - जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी सिटीस्कॅन मशिनचे उद््घाटन तर झाले मात्र प्रत्यक्ष रुग्णसेवेत येण्यासाठी या सुविधेची रुग्णांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे. या मशिनची चाचणी व कार्यालयीन प्रक्रिया होणे बाकी असल्याने शनिवारी तपासणी होऊ शकल्या नाहीत.जिल्हा रुग्णालयात या पूर्वी असलेले सिटीस्कॅन मशिन कालबाह्य झाल्याने गेल्या सहा वर्षांपासून ही सुविधा बंद पडलेली आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. त्यानंतर दीड वर्षापूर्वी डीपीडीसीमधून निधी उपलब्ध झाल्याने 3 कोटी 41 लाख रुपये किंमतीचे अद्यायावत सिटीस्कॅन मशिन रुग्णालयाला मिळाले. मात्र कोणत्या न कोणत्या कारणाने ते सुरू होऊ शकले नाही. अखेर त्याच्या खोलीचे काम पूर्ण होण्यासह इतर काम झाले. मात्र त्याच्या चाचणी व इतर कार्यालयीन प्रक्रिया होणे बाकी आहे. असे असले तरी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा करार झाला आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते या सीटीस्कॅनचे उद्घाटन उरकण्यात आले. उद्घाटनानंतर येथे लगेच ही सुविधा सुरू होण्याची अपेक्षा असताना मात्र तसे झाले नाही. चाचणीच झालेली नसताना ते सुरू तरी कसे होईल ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

सिटीस्कॅनचा शुभारंभ झाल्याचे समजल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला व आता सीटीस्कॅन करता येईल, यासाठी येथे विचारणा होऊ लागली. मात्र त्यांचा हिरमोड झाला. चाचणी झाली नसल्याने ते सुरू करता येत नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आहे. 

मग उद््घाटनाची घाई का?सिटीस्कॅन मशिन प्रत्यक्ष रुग्णसेवेत येऊ शकत नाही, असे असताना केवळ उद्घाटनाची घाई का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.