००००००००००००००
आर. आर. विद्यालय व महाविद्यालय (फोटो)
आर. आर. विद्यालय व न्यू इंग्लिश मीडियम स्कूल व भा. का. लाठी विद्यामंदिर आणि आर. आर. कनिष्ठ महाविद्यालय येथे संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप लाठी, सचिव मुकुंद लाठी, धनश्याम लाठी, अनिल लाठी, वसंतराव सोनवणे, एम. के. कासट, आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन आर. एस. सोनवणे, बी. ए. पानपाटील यांनी केले. कार्यक्रमामध्ये आर. आर. विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. आर. श्रावगी, डी. टी. पाटील, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य योगेश चौधरी, जी. के. नाईक, प्रा. सोनाली रेंभोटकर व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
००००००००००००
का. ऊ. कोल्हे विद्यालय (फोटो)
काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोक शिक्षण मंडळाच्या ज्येष्ठ संचालिका सिंधू कोल्हे व पीयूष कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अवधूत पाटील, एस. डी. खडके, मुख्याध्यापिका जे. आर. गोसावी, उपमुख्याध्यापक ए. व्ही. ठोसर, एच. जी. काळे, प्राथमिक मुख्याध्यापिका एस. डी. वाणी, बालविहार मुख्याध्यापिका एस. पी. भारंबे, आदींची उपस्थिती होती.
०००००००००००००
संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय (फोटो)
मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय येथे संस्थेचे उपाध्यक्ष शामकांत सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, सचिव मुकेश नाईक, राजेंद्र सानप, रमेश चाटे, आदींची उपस्थिती होती. मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी सूत्रसंचालन केले. आभार उज्ज्वल नन्नवरे यांनी मानले.
००००००००००००
संस्कृती माध्यमिक विद्यालय
मेहरूण येथील संस्कृती माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम नगरसेवक गणेश सोनवणे यांच्या हस्ते झाला. यावेळी ज्ञानेश्वर नाईक, अनिल पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन अश्विनी फालक यांनी केले. आभार ईश्वर पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका डिंपल येवले, ज्योती सोनवणे, सुहास कोल्हे, मनीषा जाधव, माधुरी बिजलपुरे, विवेकानंद तायडे, कविता पाटील, वंसत महाजन, आदींनी परिश्रम घेतले.