शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान वाढले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 13:07 IST

पहिल्या दोन तासात ४.२६ टक्के मतदान

जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण पाहिले तर दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान मतदानाची टक्केवारी अधिक वाढल्याचे दिसून येते. ११ पैकी सात मतदार संघात दुपारी ३ ते संध्याकाळी ५ या वेळेत तर दुपारच्या तुलनेत मतदान घटल्याचे चित्र आहे. सकाळी सात ते नऊ या दोन तासात जळगाव शहर मतदार संघात तर केवळ २.४९ टक्के मतदान झाले.विधानसभा निवडणुकीसाठी २१ रोजी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १५ टक्केही मतदान झालेले नव्हते. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात केवळ ४.२६ टक्के मतदान झाले. त्यानंतर दुसऱ्या दोन तासात त्यात १०.१ टक्क्याने भर पडून सकाळी ११ वाजेपर्यंत १४.३६ टक्के मतदान झाले. नंतरच्या दोन तासात टक्केवारीचे प्रमाण वाढत जाऊन १२.८७ टक्क्याने मतदान वाढून दुपारी १ वाजेपर्यंत २७.२३ टक्के मतदान झाले. दुपारी एक ते तीन या दरम्यान आणखी प्रमाण वाढले व या दोन तासात १३.९५ टक्क्याने भर पडून तीन वाजेपर्यंत ४१.१८ टक्के मतदान झाले. मात्र दुपारी तीन ते संध्याकाळी पाच या दोन तासात हे प्रमाण घटून १३.४१ टक्के मतदान झाले.एरव्ही बहुतांश निवडणुकीवेळी दुपारी मतदानाची गती कमी होते. मात्र या वेळी जिल्ह्यातील सरासरी मतदानाचे प्रमाण दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान वाढल्याचे चित्र आहे.सात मतदार संघात घसरली टक्केवारीजिल्ह्यातील ११ मतदार संघापैकी सात मतदार संघात दुपारी तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत दुपारच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीचे प्रमाण घटले. यामध्ये चोपडा मतदार संघात दुपारी एक ते तीन या वेळेत १५.२४ टक्क्याने मतदान वाढले होते तर तीन ते संध्याकाळी ५ या वेळेत केवळ १३.८७ टक्क्यांनी वाढ झाली.रावेर मतदार संघातही दुपारी एक ते तीन या वेळेत १४.९७ टक्क्याने मतदान वाढले तर तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत १४.९५ टक्क्यानेच मतदान वाढ झाली. अमळनेरमध्येही दुपारी तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत प्रमाण घटले. एरंडोल मतदार संघात दुपारी एक ते तीन या वेळेत १६.१२ टक्क्याने तर तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत केवळ १४.६७ टक्क्याने प्रमाण वाढले. चाळीसगावातही दुपारी एक ते तीन या वेळेत १५.०४ टक्क्याने तर तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत केवळ १२.८१ टक्क्याने मतदान वाढले. जामनेर मतदार संघातही दुपारी एक ते तीन या वेळेत १६.०३ टक्क्याने आणि तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत १४.७६ टक्क्याने मतदान वाढले. मुक्ताईनगरातही दुपारी एक ते तीन या वेळेत १५.७१ टक्क्याने आणि तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत केवळ १४.१ टक्क्याने मतदानात वाढ झाली.‘जळगाव ग्रामीण’ व अमळनेर मतदारसंघात दुपारी घसरली टक्केवारीजिल्ह्यातील ११ पैकी ९ मतदार संघात दुपारी एक ते तीन या दोन तासात मतदानाचे प्रमाण वाढले. मात्र जळगाव ग्रामीण व अमळनेर मतदार संघात हे प्रमाण कमी झाले. जळगाव ग्रामीण मतदार संघात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत १३.८२ टक्क्याने मतदान वाढले होते मात्र दुपारी एक ते तीन या वेळेत हे प्रमाण घटले. या दोन तासात केवळ १३.४५ टक्क्याची भर पडली. मात्र दुपारी तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत हे प्रमाण वाढून या दोन तासात १३.६१ टक्क्याने मतदान वाढले. अमळनेरात मात्र सकाळी ११ ते दुपारी १ या दोन तासात मतदानासाठी अधिक उत्साह दिसून आला. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत येथे १५.३२ टक्क्याने मतदान वाढले. मात्र नंतर हे प्रमाण कमी-कमी होत गेले. दुपारी १ ते तीन वाजेदरम्यान १३.५७ टक्क्याने मतदान वाढले व दुपारी तीन ते संध्याकाळी ५ या वेळेत त्यात केवळ ११.०१ टक्क्याची भर पडली.

टॅग्स :Jalgaonजळगाव