शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय जल आयोग पथकाची पाडळसेला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2017 00:53 IST

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत पाडळसे समावेश करण्यासाठी केंद्रीय जल आयोग पथकाने निमA तापी प्रकल्प पाडळसे प्रकल्पाला आज भेट दिली

अमळनेर : प्रधानमंत्री  कृषी सिंचन योजनेत पाडळसे समावेश करण्यासाठी केंद्रीय जल आयोग पथकाने निमA तापी प्रकल्प पाडळसे प्रकल्पाला आज भेट दिली. पथकाने पाडळसे प्रकल्प, पुनर्वसन, उपसा सिंचन योजनांची पाहणी केली असून केंद्राकडे अहवाल पाठविण्यात येणार आहेत. निम्न तापी प्रकल्प पाडळसरेला 2011 मध्ये केंद्रीय जलआयोगाची तत्वत: मान्यता मिळालेली असून प्रकल्पास अंतिम मान्यता बाकी आहे.पाडळसे प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाची अंतिम मान्यता मिळण्यासाठी केंद्र शासनाने आयोगाचे विभागीय संचालक मनोज पवनीकर व एक सहकारी धरण व त्यासंबंधीच्या सर्व घटकांची पाहणी, सद्यस्थिती आणि भौगोलिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष पाडळसे येथे पाठवले होते. पथकाने सकाळी नऊ वाजेपासून पाहणीला सुरुवात केली. धरणाचे झालेले काम, पाडळसे, बोहरा व इतर गावाचे पुनर्वसन, गावठाण, उपसा सिंचन योजनांची पाहणी नवीन प्रस्तावित उपसा सिंचन योजनांची जागा, नीम- मांजरोद पुलाची जागा, जळोद-बुधगाव पुलाची पाहणी, चोपडा तालुक्यातील विचखेडे-धुपे आदी बाधित होणा:या गावांची पाहणी सायंकाळी सात वाजेर्पयत करण्यात आली. दरम्यान निधी मिळण्यासाठी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी 26 जानेवारी रोजी जलसत्याग्रह करण्याचा इशारा दिला होता. तर आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी विधानसभेबाहेर उपोषण केले  होते. आमदार स्मिता वाघ यांनीही उपोषणाला पाठिंबा देवून निधीची मागणी केली होती.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट झाल्यास केंद्र व राज्याचे 75:25 किंवा 90:10 प्रमाणात केंद्राकडून निधी मिळू शकतो. जळगाव जिल्ह्यातील वाघूर तसेच धुळे जिल्ह्यातील वाघूर तसेच धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणांच्या धर्तीवर पाडळसे प्रकल्पाचा समावेश पुढील वर्षी समावेश होवू शकतो आणि तीन ते चार वर्षाचा कृती आराखडा देवून निधी मिळाल्यास काम होवू शकते असे उपविभागीय कार्यकारी अभियंता अनिल सुर्यवंशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याबाबत माजी आमदार पाटील यांच्याशी अधिकार्यानी चर्चा केली व प्रकल्पाला अंतिम मान्यता दिली जाणार असल्याचे सांगितले.केंद्रीय जलआयोगाच्या पथकाने पाडळसरे ग्रामस्थाशी गावठाण पुनर्वसन बाबत संवाद साधत समस्या जाणून घेतल्या, यावेळी धरण पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष भागवत पाटील, सरपंच रमेश पाटील, भूषण पाटील, रनछोड पाटील, रवींद्र पाटील हेडावे आदी यावेळी उपस्थित होते.        (वार्ताहर)धरणाचा खर्च वाढलाया पाडळसरे प्रकल्पामुळे जवळपास 43 हजार 600 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मात्र दरवर्षी निधी अपुर्ण मिळत असल्याने, या प्रकल्पाची किंमत 3200 कोटीवर पोहचली आहे.या पाडळसरे प्रकल्पाचा पाच तालुक्यांना फायदा होणार आहे.पाणी उचलण्यासाठी स्वतंत्र उपसा सिंचना योजनांसाठी एक हजार कोटी वेगळे अपेक्षित आहेत.