शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे नवविवाहित वधूची कौमार्य चाचणी होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:11 IST

जळगाव : कंजरभाट समाजातील कौमार्य चाचणी या अनिष्ट प्रथेमुळे समाजातील स्त्रियांना कलंकित आणि मानहानीकारक जीवन जगावे लागते. त्यामुळे इथून ...

जळगाव : कंजरभाट समाजातील कौमार्य चाचणी या अनिष्ट प्रथेमुळे समाजातील स्त्रियांना कलंकित आणि मानहानीकारक जीवन जगावे लागते. त्यामुळे इथून पुढे कंजरभाट समाजात कोणत्याही नवविवाहितेची कौमार्य चाचणी होणार नाही. ही अनिष्ट प्रथा तत्काळ थांबवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समिती पुढाकार घेईल, असा निर्धार जातपंचायतील मुठमाती राज्यस्तरीय संकल्प परिषदेत करण्यात आला. दिवसभर चाललेल्या या परिषदेत पाच ठराव करण्यात आले.महाराष्ट्र अंनिस आणि जळगाव जिल्हा महिला असोसिएशन यांच्या पुढाकाराने रविवारी कांताई सभागृहात जातपंचायतीला मुठमाती राज्यस्तरीय संकल्प परिषद झाली. त्यात हे ठराव करण्यात आले. विशेष म्हणजे या परिषदेला जात पंचायत प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यांच्या मनोगतानंतर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता़अध्यक्षस्थानी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील होते. आमदार सुरेश भोळे, जातपंचायतीला मूठमाती अभियान विभागाचे राज्य प्रमुख कृष्णा चांदगुडे, राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, बानो बागडे, राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी. एस. कट्यारे, जिल्हा महिला असोसिएशन अध्यक्षा राजकुमारी बाल्दी उपस्थित होते.कौमार्य चाचणी पुरुषांची का नाही.. महिलेने केला सवालसकाळी झालेल्या सत्रात एका महिलेने 'कौमार्य चाचणी केवळ महिलांचीच का? पुरूषांची का नाही? असा सवाल उपस्थित केला व अन्य महिलांचाही आवाज घुमू लागला़ पंचायतीच्या प्रतिनिधींना उत्तर देण्याची मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली़ मात्र, हा वाद विवादाचा कार्यक्रम नसल्याचे सांगत आयोजकांनी त्यांना थांबविले़ जात पंचायतीच्या प्रतिनिधींची भूमिका आपल्याला मान्य नसल्याचे विनायक सावळे यांनी स्पष्ट केले़ यानंतर या वादावर पडदा पडला.असे झाले ठराव-मानसी ऊर्फ मुस्कान बागडे या मृत तरुणीच्या परिवाराला भीतीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र अंनिस तर्फे मानसोपचार तज्ञांची मदत पुरविली जाईल.-महाराष्ट्रातील कंजारभाट समाजातील किंवा इतर जाती, पोटजातीतील जात पंचायतसदस्य यांच्याशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने यापुढेही सतत सुसंवादसाधण्याचा प्रयत्न करण्यात येईल.-सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण या कायद्यासाठी गृह व सामाजिक न्याय विभागाकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तातडीने पाठपुरावा करेल.-सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा प्रबोधनासाठी शासनाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात यावी.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव