शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ कॉल करुन महिलेशी अश्लिल वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 11:40 IST

पुण्यातून एकास अटक : बोदवडच्या महिलेने केली होती तक्रार

ठळक मुद्देसंशयित गॅरेजवर आहे कामाला

जळगाव : व्हिडीओ कॉल करुन बोदवड तालुक्यातील एका महिलेशी अश्लिल वर्तन करणाऱ्या संदीप सिताराम कांबळे (३०, रा.गुलटेकडी, नुरानी मशिदीजवळ, पुणे) याला स्थानिक गुन्हे शाखा व बोदवड पोलिसांनी बुधवारी पुण्यातून अटक केली. त्याच्याविरुध्द विनयभंग व आयटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील महिला सरिता (काल्पनिक नाव) महिला ७ डिसेंबर २०१८ रोजी घरकाम करीत असताना एका अनोखळी क्रमांकावरुन मोबाईलवर एक कॉल आला. समोरील व्यक्तीने दोन मिनिटे तुझ्याशी बोलायचे अ सल्याचे सांगितले. त्यावर सरिता हिने मी तुला ओळखत नाही, असे सांगत फोन कट केला.त्यानंतर थोड्याच वेळाने पुन्हा सरिता यांच्या मोबाईलवर या व्यक्तीने व्हिडीओ कॉल करुन सरिता यांच्याशी अश्लिल वर्तन केले...यावेळी त्याने स्वत: चा चेहरा दाखविला नाही. सरिता यांनी ही माहिती पती, सासु, सासरे व भाऊ यांना दिली. याप्रकरणी १४ डिसेंबर २०१८ रोजी बोदवड पोलीस स्टेशनला ३५४ (अ) (९) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या कलमान्वये गुन्हा सिध्द झाला तर तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते असे कायद्यात तरतूद आहे.चुकून क्रमांक डायल झाला अन्..पोलिसांनी संदीप याला अटक करुन जळगावात आणले असता त्याने नातेवाईकाला फोन लावत असताना एक क्रमांक चुकीचा डायल झाला व समोरुन तरुणीचा आवाज ऐकू आल्याने हा क्रमांक सेव्ह केला. त्यामुळे त्या क्रमांकावर संपर्क केला नंतर व्हिडीओ कॉल केल्याचे चौकशीत सांगितले. चुकीचा क्रमांक लागला नसता तर ही वेळच आली नसती, असेही तो म्हणाला. दरम्यान, संशयित संदीप हा पुण्यात गॅरेजवर काम करतो.दोन महिन्यात शोधला विकृतगुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे आले. बोदवडचे उपनिरीक्षक अशोक उजगरे, हे.कॉ.संजय भोसले, निखील नारखेडे व सचिन चौधरी तर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी विजय पाटील, नरेंद्र वारुळे, रवींद्र गिरासे, चंद्रकांत पाटील व दिनेश बडगुजर यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यांनी केलेल्या चौकशीत व्हिडीओ कॉल करणारा संदीप सिताराम कांबळे हा असून तो पुण्यात राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बोदवडच्या पथकाने पुणे गाठून संदीप याला बुधवारी जळगावात आणले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी