शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरण : सतीश पाटील, ईश्वरलाल जैन यांच्यासह २२ जणांविरुध्द दोषारोप दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:08 IST

नीलेश पाटीलविरुध्द वॉरंट जारी

जळगाव : जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन सरकारच्या विरोधात घंटानाद व रस्ता रोको आंदोलन केल्याच्या प्रकरणात राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार डॉ.सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, माजी खासदार ईश्वरलाल जैन माजी आमदार दिलीप वाघ, साहेबराव पाटील यांच्यासह २२ जणांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. या सर्वांनी मंगळवारी न्यायालयात गुन्हा नाकबुल असल्याचे सांगितले.पेट्रोल डिझेलची भरमसाठ वाढ झाल्याने २०१६-१७ मध्ये राष्टÑवादीतर्फे शहरात राज्यशासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी राष्टÑवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुध्द विविध पोलीस स्टेशनला तीन गुन्हे दाखल झाले होते. त्यात दोन प्रकरणात न्या.जी.जी.कांबळे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. मंगळवारी न्यायालयात आलेल्या सर्वांनाच न्यायालयाने गुन्हा कबुल आहे का? अशी विचारणा केली असता त्यांनी अमान्य असल्याचे सांगितले.राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार डॉ.सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, माजी खासदार ईश्वरलाल जैन माजी आमदार दिलीप वाघ, साहेबराव पाटील, गफ्फार मलिक, योगेश देसले, मंगला पाटील, कल्पना पाटील, कल्पिता पाटील, डिंपल पाटील, दीपाली योगेश पाटील, प्रतिभा शिरसाठ, परेश कोल्हे, विशाल देवकर, वाल्मिक पाटील, गणेश बुधा सोनवणे, इब्राहीम पटेल, नामदेव चौधरी,यागेश दत्तू पाटील व भगत बालाणी मंगळवारी न्यायालयात हजर झाले.नीलेश पाटीलचा अर्ज फेटाळलानीलेश पाटील यांनी गैरहजर राहण्याबाबत अर्ज दिला होता. न्यायालयाने तो रद्द करुन त्यांच्याविरुध्द वारंट जारी करुन २० आॅगस्ट हजर राहण्याचे आदेश बजावले आहे. आता पुढील कामकाज २० आॅगस्ट रोजीच होणार आहे. त्यादिवशी सर्वांनाच हजर राहण्याचे न्यायालयाने बजावले आहे. न्या.जी.जी. कांबळे यांच्या न्यायालयात हे कामकाज सुरु आहे. सरकारतर्फे अ‍ॅड.आर.पी. गावीत यांनी आमदार सतीश पाटील, माजी खासदार जैन यांच्यासह २० जणांतर्फे अ‍ॅड. कुणाल पवार यांनी इब्राहीम पटेलतर्फे अ‍ॅड.इम्रान खान व गफ्फार मलिक यांच्यातर्फे अ‍ॅड.अजिम शेख यांनी काम पाहिले.

टॅग्स :Jalgaonजळगाव