शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

भालोद येथे आमदारांच्या शिक्षण संस्थेतून पोषण आहाराचा तांदूळ बाहेर जाताना सतर्क तरुणांनी पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:52 IST

आमदार हरिभाऊ जावळे अध्यक्ष असलेल्या सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून शुक्रवारी सायंकाळी पोषण आहाराच्या तांदळाने भरलेली रिक्षा (एमएच-१९-एएक्स-९८१०) द्वारे बाहेर नेत असताना गावातील सतर्क तरूणांनी ती पकडली असल्याने ही घटना उघड झाली आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागासह पोलीस यंत्रणेची घटनास्थळी धावगावातील तरुणांनी पकडला पोषण आहाराचा तांदूळ

यावल/भालोद, जि.जळगाव : जिल्ह्यात पोषण आहाराचा विषय गाजत असताना पुन्हा विद्यार्थ्यांच्या तोंडचा संभाव्य घास हिसकावणारी घटना भालोद येथे उघडकीस आली. आमदार हरिभाऊ जावळे अध्यक्ष असलेल्या सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून शुक्रवारी सायंकाळी पोषण आहाराच्या तांदळाने भरलेली रिक्षा (एमएच-१९-एएक्स-९८१०) द्वारे बाहेर नेत असताना गावातील सतर्क तरूणांनी ती पकडली असल्याने ही घटना उघड झाली आहे.याबाबत वृत्त असे की, आमदार हरिभाऊ जावळे अध्यक्ष असलेल्या भालोद येथील सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून शुक्रवारी तांदळाने भरलेली रिक्षा बाहेर जात होती. तेव्हा गावातील गौरव भालेराव, राहुल भालेराव, भरत भालेराव व शाळेसमोर बसलेल्या काही जणांनी आहाराचा तांदूळ घेऊन निघणारी रिक्षा पकडली. या रिक्षामध्ये सुमारे तीन क्विंटल तांदळाच्या सहा गोण्या होत्या.तरूणांनी ही माहिती यावलचे गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना दिली. सपकाळे यांनी तातडीने गटशिक्षणाधिकारी एजाज शेख यांना सांगितले. तेव्हा शेख व पोषण आहार अधिकारी गणेश शिवदे, शिक्षण विस्तार अधिकारी नईम शेख, केद्रप्रमुख तायडे यांनी घटनास्थळी भेट दिली. संस्थेच्या प्राथमिक व हायस्कूलच्या पोषण आहाराच्या गोदामातील रेकॉर्डनुसार मालाची तपासणी केली. ही तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोषण आहाराचा तांदूळ घेऊन जात असलेल्या रिक्षाचे काही नागरिकांनी चित्रीकरण करत सोशल मीडियावर व्हायरल केल्याने यावल तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.दरम्यान, हा तांदूळ कुठे व कुणाकडे जात होता, याचीही चौकशी करणे गरजेचे आहे.घटनास्थळी पो.कॉं. विकास कोल्हे व सुरेश तायडे तत्काळ दाखल झाले. याबाबत गटशिक्षणाधिकारी यांना गुन्हा दाखल करणार का विचारले असता त्यांनी सांगितले की, ज्यांनी तांदूळ पकडून दिला त्यांनी फिर्याद द्यायला पाहिजे, असे बोलून विषय टाळला. मात्र यात कोण अधिकारी, शिक्षक आहे? याची चर्चा गावात सुरू होती. याबाबत गुन्हा दाखल होतो की नाही याकडे तालुकावासीयाचे लक्ष लागून आहे. रात्री उशिरापर्यंत गावातील नागरिकांची शाळेसमोर गर्दी होती. 

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल