शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- चाळीसगावात बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

By admin | Updated: April 17, 2017 15:50 IST

ऑनलाइन लोकमत जळगाव, दि. 17-  महामार्ग व राज्य मार्गावर दारुबंदी झाल्याचा गैरफायदा घेत चाळीसगाव शहराला लागून एका शेतात तिघांनी ...

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 17-  महामार्ग व राज्य मार्गावर दारुबंदी झाल्याचा गैरफायदा घेत चाळीसगाव शहराला लागून एका शेतात तिघांनी सुरू केलेला बनावट दारुचा कारखाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उद्ध्वस्त केला. यात दारु बनविण्याचे साहित्य, स्पिरिट, रिकाम्या बाटल्या, बुच, पॅकींग मशीन यासह 1 लाख 11 हजार 535 रुपयांची बनावट दारु हस्तगत करण्यात आली आहे. बाजारात विक्रीला जाण्याआधीच हा साठा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल उपस्थित होते.चाळीसगाव शहरात बायपास रस्त्यावर पाटणा देवी फाटा ते कन्नड फाटा या दरम्यान एका पडीत शेतात तीन जण बनावट देशी व विदेशी दारु निर्मिती करीत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक डॉ. सुपेकर यांना मिळाली होती. त्यानुसार सुपेकर यांनी अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक चंदेल यांना पाळत ठेऊन पथकाद्वारे कारवाईचे आदेश दिले होते. उपनिरीक्षक प्रकाश इंगळे, हेडकॉन्स्टेबल दिलीप येवले, अशोक चौधरी, मंगलसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, सतीष हळणोर, रवींद्र घुगे, रमेश चौधरी, रवींद्र गायकवाड, मिलिंद सोनवणे,गफ्फार तडवी, प्रकाश महाजन, दत्तात्रय बडगुजर, महेश पाटील, योगेश पाटील, मनोज दुसाने,सुशील पाटील, दीपक पाटील व प्रवीण हिवराळे आदींच्या पथकाने दोन दिवस पाळत ठेऊन सापळा यशस्वी केला.मालेगावचा फिरोज मास्टरमाईंडबनावट दारु तयार करुन ती हॉटेल,ढाब्यावर विक्री करायची याचे नियोजन फिरोजखान अहमदखान (वय 30 रा.मालेगाव) याने केले होते. चाळीसगाव परिसरातून सगळीकडे माल पोहचविणे सहज सोपे होईल या उद्देशाने त्याने चाळीसगाव हे ठिकाण निवडले व त्यासाठी स्थानिक नदीमखान शाबीरखान (वय 23) व शाहरुख शेख रफिक शेख (वय 24) या दोघांची मदत घेतली.बनावट देशी दारुसाठी लागणारे स्पीरीट (इसरा),विदेशीसाठी लागणारे रसायन, रंग आदी साहित्य  फिरोजखान याने मध्यप्रदेशातून आणले होते. विविध देशी व विदेशी ब्रॅँडच्या रिकाम्या बाटल्या, बूच, पॅकींग मशीन, पातेले, शुध्द पाणी आदी साहित्य घेऊन दोन दिवसापूर्वीच कारखाना थाटला होता.

https://www.dailymotion.com/video/x844vqx