भुसावळ, जि.जळगाव : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून बसफेºया रद्द करण्यात आल्या होत्या. कोरोनासोबत अर्थचक्र सुरू व्हावे या उद्देशातून २२ मेपासून शासनाने जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू करण्याचे निर्णय घेतला. पहिल्या दिवशी भुसावळ आगारातून वरणगाव फॅक्टरीसाठी सोडण्यात आलेल्या बसमध्ये एकाही प्रवाशाने प्रवास केला नाही. पहिल्या दिवशी प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला.जनजीवन हळूहळू पूर्वपदावर यावे सोबत अर्थचक्र सुरू व्हावे या उद्देशातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हांतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली. मात्र भुसावळ आगारातून दुपारपर्यंत झालेल्या फेऱ्यांमध्ये अत्यल्प प्रतिसाद मिळाला. वरणगाव फॅक्टरीसाठी एकूण लालपरीच्या तीन फेºया झाल्या. पहिल्या फेरीत- ० प्रवासी, दुसºया फेरीत- ४, तर तिसºया फेरीत फक्त -२ प्रवाशांनी प्रवास केला. या तीन फेºयांमधून फक्त १०० रुपये उत्पन्न मिळाले. बोदवडसाठी दोन फेºया करण्यात आलेल्या या दोन्ही फेºयांमध्ये फक्त १० प्रवाशांचे २०० रुपयांचे उत्पन्न, रावेरसाठी एक फेरी करण्यात आली. यामध्ये १८ प्रवासी व ९०० रुपये, जामनेरसाठी फक्त आठ प्रवाशांनी प्रवास केला.
भुसावळात लालपरीला अत्यल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 14:38 IST
पहिल्या दिवशी भुसावळ आगारातून वरणगाव फॅक्टरीसाठी सोडण्यात आलेल्या बसमध्ये एकाही प्रवाशाने प्रवास केला नाही.
भुसावळात लालपरीला अत्यल्प प्रतिसाद
ठळक मुद्देपहिल्या फेरीत एकही प्रवासी नाहीसकाळच्या पहिल्या तीन फेऱ्यांमधून उत्पन्न मिळाले फक्त १००