शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

वर्चस्वासाठी आटापिटा..

By admin | Updated: July 17, 2014 15:03 IST

भुसावळ नगरपालिकेची निवडणूक कधी नव्हे इतकी चुरशीची आणि अनेक राजकीय स्थित्यंतरे घडविणारी ठरणार आहे.

नगराध्यक्ष निवडणूक : संतोष चौधरी यांची सत्ता उलथविण्यासाठी सर्वच एकवटले

भुसावळ : भुसावळ नगरपालिकेची निवडणूक कधी नव्हे इतकी चुरशीची आणि अनेक राजकीय स्थित्यंतरे घडविणारी ठरणार आहे.
पालकमंत्री संजय सावकारे व माजी आमदार संतोष चौधरी या एकेकाळच्या गुरू-शिष्यांनी निवडणुकीत उडी घेतल्याने निवडणूक मोठी रंजक वळणावर आहे. या दोघा दिग्गजांचे यानिमित्त राजकीय वर्चस्व पणाला लागले आहे. शिवाय संतोष चौधरी यांची पालिकेतील सत्ता उलथवून लावण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष एकवटल्याचे चित्र आहे.
दरम्यान, या स्थानिक दिग्गजांसह विरोधी पक्षनेते आमदार एकनाथराव खडसे आणि जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांनीही अप्रत्यक्षपणे भुसावळच्या निवडणुकीत लक्ष घातल्याची पालिका, शहर आणि जिल्ह्यातील राजकारणात चर्चा सुरू आहे. त्यामुळे निवडणूक अत्यंत अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
चौधरींची सत्ता उलथविण्याचा चंग
संजय सावकारे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडल्यापासून त्यांनी अन्य राजकीय व स्वकियांच्या मदतीने माजी आमदार संतोष चौधरी यांची नगरपालिकेतील सत्ता उलथवून लावण्याचा चंगच बांधला आहे. त्यामुळे या दोघांमध्ये वितुष्ट आले आहे. त्याचा परिणाम शहराच्या विकासावरही झाला आहे. 
सत्तेच्या या राजकारणातूनच सावकारे यांनी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक युवराज लोणारी यांचे नाव पुढे केले आहे. दरम्यान आमदार खडसे यांच्यासोबत सावकारे यांची जवळीक वाढत गेली. यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसमधील पालकमंत्री संजय सावकारे यांचा गट, भाजपा आणि खाविआ अशी युती झाली. या युतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून लोणारी यांचे नाव जाहीर करण्यात आले. याच काळात खडसे, सावकारे, भाजपा आणि खाविआच्या नगरसेवकांच्या बैठका झाल्या. चर्चा झाली. लोणारी यांच्या नावावर एकमत झाले.
'व्हीप'चा परिणाम
मध्यंतरी नगराध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे वातावरण शांत होते. मात्र या पंधरवड्यात निवडणूक जाहीर होताच वेगवान राजकीय घडामोडी घडत गेल्या. वेळ कमी असल्याने प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रदेश सरचिटणीस गज्रे यांच्या माध्यमातून व जिल्हाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांनी युवराज लोणारी हे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांचे नाव निश्‍चित केले व त्यांनाच मतदान करण्याचे कळविले.
भाजपाचाही 'व्हीप'
यापाठोपाठ भाजपाचे गटनेते प्रमोद नेमाडे यांनीही व्हीप जारी करून लोणारी यांना मतदान करण्याचे सुचविले.६ जुलैला पक्षाच्या नगरसेवकांची बैठक झाली. त्यात आणि वरिष्ठांशी झालेल्या चर्चेनुसार व्हीप जारी केल्याचे नेमाडे यांनी म्हटले. 
व्हीपमधील तांत्रिक अडचणी
दरम्यान, जाणकारांच्या मते राष्ट्रवादी आणि भाजपा गटनेत्यांनी जारी केलेला व्हीप व ज्यांनी तो काढला मुळात त्यांना तो काढण्याचा अधिकार आहे का? आणि पक्षांतर बंदी नियमांच्या कसोटीवर तो टिकेल का? याचा अभ्यास केला जात आहे. 
दलित, मुस्लीम
दरम्यान, भुसावळची कोणतीही निवडणूक ही दलित, मुस्लीम समाजाच्या भोवती फिरत आली आहे. या वेळीही माजी आमदार संतोष चौधरी यांनी वर्षभरापूर्वीच भुसावळचा पुढचा नगराध्यक्ष मुस्लीम समाजाचा राहील, असे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अख्तर पिंजारी व तरन्नुम इद्रिस या दोन सदस्यांनी अर्ज सादर केले आहे. 
या दोनपैकी संतोष चौधरी सांगतील तो उमेदवार १८ रोजी माघार घेईल. कदाचित चौधरी गटाचा उमेदवार जादुई आकडा गाठू न शकल्यास विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री मुस्लीमविरोधी आहेत, असा पवित्रा घेऊन त्यांना ते कोंडीत पकडण्याचे प्रयत्न आहेत. 
व्हीप काय सांगतो..
भुसावळ नगरपालिका सभागृहातील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नईम पठाण यांनी जारी केलेल्या व्हीपमध्ये युवराज लोणारी यांच्या नावाचा कोठेही उल्लेख नसल्याने मतदानाच्या दिवशी नेमकी काय खेळी होऊ शकते याकडे लक्ष लागले आहे. संतोष चौधरी
युवराज लोणारी भाजपाकडून दुसरा व्हीप..
■ गटनेते प्रमोद नेमाडे यांनी प्रथम युवराज लोणारी यांना मतदान करण्याचा व्हीप काढला होता. त्यानंतर पुन्हा राजकीय घडामोडी घडल्या. नगरसेवक अजय भोळे यांनी दुसरा व्हीप जारी करून प्रमोद नेमाडे यांना मतदान करण्याचे आदेश काढले. भुसावळची निवडणूक देवेंद्र फडणवीसांपर्यंत
■ भुसावळची नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजपाचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचली आहे. भाजपाचे गटनेते प्रमोद नेमाडे यांनी युवराज लोणारींसाठी जारी केलेला व्हीप आमदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून फडणवीस यांच्यापर्यंत पोहचविण्यात आल्याची माहिती आहे. भाजपात आलेले अनिल चौधरी यांनी ही बाब महाजन यांच्या कानावर घातल्याची चर्चा आहे. भाजपा असा व्हीप काढू शकतो का? असाही प्रश्न भाजपामधून विचारला जात आहे.