शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

विना परवानगी प्रचार करणारे वाहने होणार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:05 IST

निवडणूकविषयक मार्गदर्शन बैठक

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव व रावेर मतदार संघासाठी आता उमेदवार निश्चित झाले असून यापुढे दोन्ही लोकसभा मतदार संघात विना परवानगी ध्वज व बॅनर लावलेले वाहने प्रचार करत असतील अशा वाहन धारकांवर तातडीने गुन्हे दाखल करुन वाहने ताब्यात घ्यावे व निवडणूक होईपर्यत ती सोडू नयेत असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी मंगळवारी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात मंगळवारी लोकसभा निवडणूक विषयी विविध मुद्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी ढाकणे यांच्यासह केंद्रीय निवडणूक निरीक्षक डॉ. अजयकुमार, छोटे लाल पासी, असिम विक्रांत मिंज, मधुकर आनंद, वेणूधर गोडेसी, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाडे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, अपर पोलीस अधिकारी रोहित मतीन आदी उपस्थित होते.चेकपोस्टवर व सीमावर्ती भागात सी.सी.टी.व्ही.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक भयमुक्त व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करावे व आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. निवडणूक कालावधीत सर्व यंत्रणांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचे पालन करुन काम करावे. निवडणुकीच्या कालावधीत सर्व चेकपोस्टवर व सीमावर्ती भागात सी.सी.टी.व्ही. बसविण्यात आले असून त्या ठिकाणी एस.एस.टी व एफ.एस.सी. पथकांनी व पोलीस यंत्रणांनी बारकाईने लक्ष ठेवावे व वाहनांची कडक तपासणी करावी. यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राहू ठेवा अशा सूचनाही डॉ. ढाकणे यांनी यावेळी केल्या. कम्युनिकेशन प्लॅन करताना त्यात सर्व बाबीचा उल्लेख केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. निवडणूक कालावधीत नियंत्रणासाठी एस.एस.टी व एफ.एस.सीच्या ३६ पथकांमध्ये २८८ अधिकारी व कर्मचारी कार्यरत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.एकाच उमेदवाराला वारंवार मैदान देऊ नयेउमेदवाराने निवडणूक कालावधीत रोजचा खर्चाचा अहवाल दररोज सादर करावा. यासाठी सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षकांनी उमेदवारांच्या खर्चावर गांभीर्याने नजर ठेवावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. उमेदवाराने निवडणूक कालावधीत प्रचारासाठी मैदान आरक्षित केले असेल तर त्या वेळेत उपलब्ध करुन द्यावे, परंतु एकच उमेदवार वारंवार मैदान आरक्षित करत असेल तर त्यांना मैदान उपलब्ध करुन देवू नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या.एकमेकांच्या संपर्कात रहायावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक डॉ. अजयकुमार म्हणाले की, निवडणूक कालावधीत सर्व यंत्रणांनी गांभीर्याने कामे करावेत, यात प्रामुख्याने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, कम्युनिकेशन प्लॅन, मतदान केंद्रे, नोडल अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, व्हिडिओ ग्राफर यांनी एकमेकांच्या संपर्कात राहून कामे करावेत असेही त्यांनी सांगितले.गुन्हेगारांवर वचक ठेवानिवडणूक कालावधीत पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने नाका तपासणीवर मोठ्या प्रमाणात भर द्यावा व निवडणूक कालावधीत अवैध मद्य वाहतूक व मोठ्या रक्कमेची वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक ठेवा असे केंद्रीय पोलीस निरीक्षक असिम मिंज यांनी सांगत जास्तीत जास्त गुन्हे कसे दाखल केले जातील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या.उमेदवारांच्या सभेचे सर्व रेकॉर्डिंग करासर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगांच्या नियमांची पालन करुन दररोज निवडणूक खर्चाची माहिती द्यावी व सर्व उमेदवारांना समान न्याय देण्यासाठी यंत्रणांनी काम करावे, अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक मधुकर आनंद व वेणूकर गोडेसी यांनी दिल्या. सोबतच उमेदवारांच्या सभेचे सर्व रेकॉर्डिंग, व्हिडिओग्राफरने करावे, यामुळे उमेदवारांनी सभेसाठी किती खर्च केला हे लक्षात येते असेही त्यांनी यावेळी स्स्पष्ट केले.या बैठकीस जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, उप विभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, बीडीओ, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, पोलीस निरीक्षक, नोडल अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव