शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रवचनानुसार वटपौर्णिमा व्रत बुधवारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 12:24 IST

सूर्योदयानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत वटपूजन करावे

ठळक मुद्देसकाळी ८.१२ पर्यंत चतुर्दशीचा मुहूर्तफांदी तोडून पूजन करणे टाळा

प्रसाद धर्माधिकारीनशिराबाद, जि. जळगाव : पतीस दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी विवाहित महिला वटपौर्णिमा व्रत करतात. ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. यादिवशी वडाच्या वृक्षाचे पूजन व उपवासाला अनन्य महत्त्व आहे. मात्र यंदा वटसावित्री पौर्णिमा बुधवारी की गुरुवारी हा थोडा संभ्रम निर्माण झाला असला तरी २७ जून रोजी बुधवारीच वटपौर्णिमा साजरी होत आहे.बुधवारी सकाळी ८ वा. १२ मिनिटांपर्यंत चतुर्दशी असून त्यानंतर पौर्णिमेस प्रारंभ होत आहे. व गुरुवारी सकाळी १० वा.२३ मिनिटापर्यंत पौर्णिमा आहे. सूर्यास्तापूर्वी ६ घटीपेक्षा अधिक व्यापिनी अशा चतुर्दशीयुक्त असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीव्रत (वटपूजन) करावे, असे शास्त्रवचन आहे. त्यामुळे दि.२७ रोजी बुधवारी चतुर्दशी ८ वा.१३ मी.पर्यंत असल्याने याच दिवशी पौर्णिमा तिथी सायंकाळी ६ घटीपेक्षा अधिक असल्याने बुधवारीच वटपौर्णिमा पूजन व उपवास करावा. बुधवारी सकाळी चतुर्दशी तिथी असली तरी सूर्योदयानंतर मध्यान्हापर्यंत म्हणजे दुपारी सुमारे दीड पर्यंत कोणत्याही वेळी वटपूजन करावे असा खुलासा दाते पंचांगात दिलेला आहे.वटवृक्षाचे यादिवशी महिला सुत गुंडाळून पूजन करतात. ऋतुफल व धान्यासह सौभाग्य वाटान अर्पण करतात.पवित्र वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करीत पतीस दीर्घायुष्य, आरोग्य व सुखसमृद्धीची प्रार्थना करण्यात येते. कथा वाचन व उपवास केला जातो.फांदी तोडून पूजन करणे टाळामूळासकट असलेल्या वृक्षाचे पूजनाला अनन्य महत्त्व आहे. वटवृक्षाची फांदी तोडून घरी आणून पूजन करू नये. वडाच्या झाडाजवळ जावून पूजन करणे शक्य नसल्यास त्यापेक्षा मूळासकट असलेल्या वटरोपाचे घरी आणून पूजन करून त्याची लागवड करीत संवर्धन करा. मात्र फांदी तोडून पूजन करणे टाळा.व्रताची आख्यायिकासावित्री अश्वपतीची कन्या आहे. ती सत्यवानाला पती म्हणून निवडते. तो अल्पायुशी असल्याची भविष्यवाणी नारदमुनी वर्तवतात. मात्र सावित्री हे माहीत असताना सत्यवानाशी विवाह करते. त्याच्या मृत्यूची वेळ येऊन ठेपते. वटवृक्षाखाली त्याला मृत्यू येतो. यमराज सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे पतीबरोबर जावू लागली. पतीसोबत जाण्याचा हट्ट धरला. अखेर यमाने प्रसन्न होत तिला वर मागण्यास सांगितले व सावित्रीने तीन वर मागितले. सासू-सासऱ्यांची दृष्टी व राज्य परत मागितले व पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने तथास्तू म्हटले. सावित्री वटवृक्षाजवळ येते. सत्यवानाच्या शरीरात पुन्हा प्राण आलेले असतात. सावित्रीचे सौभाग्य टिकून राहते व ती अखंड सौभाग्यवती बनते अशी अख्यायिका आहे. त्यामुळे ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या वृक्षाचे पूजनाला महत्त्व आहे. सावित्रीसह ब्रह्मा ही या व्रताची देवता आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव