जळगाव : वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला शहरात २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असल्याची माहिती, सातपुडा बचाव कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र नन्नवरे यांनी दिली आहे. रविवारी पुणे येथे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सभासदांच्या उपस्थितीत चित्रपट महोत्सव आयोजन समितीची बैठक पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आला. २७ ते ३0 नोव्हेंबर दरम्यान चार दिवसात हा उत्सव पार पडणार आहे. या चित्रपट महोत्सवात आंतराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले ५0 चित्रपट दाखविले जाणार आहेत. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठय़ा संख्येने उपस्थिती राहणार आहे.खान्देशात पहिल्यांदा लघुपट आणि माहितीपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन या उत्सवात केले जाणार आहे. मार्गदर्शन शिबिर, व्याख्यान, कार्यशाळा, चर्चासत्र, नेचर वॉक, पक्षीनिरीक्षण आदी कार्यक्रमांची रेलचेल राहणार असल्याचेदेखील नन्नवरे यांनी कळविले आहे. महोत्सवाच्या तयारीचे नियोजन सुरू झाले आहे.
नोव्हेंबरमध्ये वसुंधरा चित्रपट महोत्सव
By admin | Updated: June 2, 2014 17:57 IST