शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

तापी पूर्णा नद्यांचा अफाट जलसागर पर्यटकांना खुणावतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 17:09 IST

मंदिर बंद असल्याने पर्यटक व भाविक ह्या पवित्र व निसर्गरम्य अफाट जनसागराच्या भेटीपासून वंचित राहत आहेत.

ठळक मुद्देचांगदेव महाराज मंदिर बंदचमंदिर परिसरात दगडी कलात्मक वस्तूंची निर्मिती सुरू

मनीष चौधरीचांगदेव, ता.मुक्ताईनगर : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव हे गाव तापी-पूर्णा या पवित्र नद्यांच्या संगमासाठी व चांगदेव महाराजांच्या हेमाडपंथी भव्य मंदिरासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्याने नद्यांच्या जलपातळीत कमालीची वाढ झालेली आहे. त्यात भर म्हणजे या नद्यांवर पुढे हतनूर धरण असल्याने पाणी अडविण्यात आल्याने चांगदेव येथील संगम स्थळावर अफाट जल सागराचे मनमोहक, सुंदर मनाला आकर्षित करणारे दृश्य पर्यटकांना खुणावत आहे. परंतु मंदिर बंद असल्याने पर्यटक व भाविक ह्या पवित्र व निसर्गरम्य अफाट जनसागराच्या भेटीपासून वंचित राहत आहेत.दरवर्षी लाखो भाविक व पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. नौकाविहाराचा आनंद घेतात व मनाला प्रफुल्लित करून आलेला थकवा मिटवतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे मंदिर परिसर मनुष्यविरहित दिसत आहे.चांगदेव महाराज मंदिर बंदचचांगदेव येथील चांगदेव महाराज मंदिर हेमाडपंथी बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. वारकरी संप्रदाय मोठ्या भावभक्तीने या ठिकाणी येत असतात. तसेच वर्षभर पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने येत असतात. हे मंदिर सहा महिन्यांच्या रात्रीत बांधल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे . हे मंदिर गेल्या सात महिन्यांपासून बंद असून भाविक व पर्यटकांची वर्दळ बंद आहे.दगडी कलात्मक वस्तूंची निर्मिती सुरूचांगदेव महाराज मंदिर पुरातत्व विभाग औरंगाबाद यांच्या ताब्यात असून या ठिकाणी सध्या मंदिर परिसरात पडलेल्या, तुटलेल्या, मोठमोठ्या दगडांपासून सुंदर कलात्मक वस्तू बनविण्यात येत आहे. यात पर्यटकांना बसण्यासाठी दगडी बेंच, पादत्राणे ठेवण्यासाठी दगडी कपाट, एवढेच नाही तर आकर्षक कचराकुंड्यासुद्धा दगडीच बनवल्या जात आहे. पर्यटकांना दगडी वस्तू एक आकर्षण ठरणार आहे.

 

टॅग्स :GovernmentसरकारMuktainagarमुक्ताईनगर