शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

वरुणराजाच्या अवकृपेच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:42 IST

कमी पावसामुळे यंदा सर्वत्र पाणी टंचाईचे भीषण संकट असताना खरीप हंगामावरदेखील मोठा परिणाम झाला आहे

विजयकुमार सैतवालजळगाव : कमी पावसामुळे यंदा सर्वत्र पाणी टंचाईचे भीषण संकट असताना खरीप हंगामावरदेखील मोठा परिणाम झाला आहे. परिणामी कडधान्याचे उत्पादन कमी होऊन त्याच्या झळा बळीराजासह उद्योग, व्यापार क्षेत्र तसेच पर्यायाने सर्वसामान्यांना बसू लागल्या आहेत.पावसाचा लहरीपणा म्हणणे आता नित्याचे झाले आहे. मात्र यंदादेखील अपेक्षित पर्जन्यमान न झाल्याने यास पर्यावरणात वाढता मानवी हस्तक्षेपच कारणीभूत आहे, हे कोणी समजून घेण्यास तयार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कमी पावसामुळे काय परिणाम होऊ शकतो, हे आॅक्टोबर महिन्यापासूनच समोर येऊ लागले असून खरीप हातचा गेल्याने रब्बी हंगामाचीदेखील आता चिंता लागली आहे. अल्प पावसामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचे यंदाही केवळ संकट कायम राहणार नसून ते वाढणार असल्याचे संकेत दिले जात आहे.पाणी टंचाईसोबतच पिकांवर परिणाम होऊन महागाईच्या झळाही जाणवू लागल्या असून उद्योग क्षेत्रही यामुळे बाधीत झाले आहे. कमी पावसामुळे कडधान्याची आवक घटल्याने त्याचा फटका दालमिललादेखील बसू लागला असून दालमिलचे उत्पादन तब्बल २५ टक्क्याने घटले आहे. त्यामुळे डाळ उद्योग पुन्हा एकदा संकटात ओढावून डाळींचे भावदेखील वाढू लागले आहे.जळगावातील औद्योगिक वसाहतीमधील डाळ उद्योग हा महत्त्वाचा घटक असून यंदा वरुणराजाच्या अवकृपेने या उद्योगावर मंदीचे ढग ओढावले जात आहे. जळगावात दररोज साधारण ५ हजार क्विंटल डाळीचे उत्पादन होते. मात्र सध्या कडधान्याची आवक घटल्याने या उत्पादनात थेट २५ टक्क्याने घट झाली आहे. ५ हजार क्विंटलपैकी आता दररोज ३७०० ते ३७५० क्विंटल डाळीची निर्मिती होत आहे. यावरूनच कमी पावसाचा किती मोठा परिणाम उद्योगांवर होत आहे, हे स्पष्ट होते.व्यापार क्षेत्रावरदेखील याचा परिणाम होण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तविली असून सध्या डाळींना मागणी असली तरी भाववाढ कायम राहिल्यास खरेदीदार हात आखडता घेतील व व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.सामान्यांचा विचार केला तर डाळीसाठी ग्राहकांना ८ ते ९ रुपये प्रती किलो जादा मोजावे लागत आहे. मुगाची डाळ ७१०० ते ७६५० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाची डाळही ५३०० ते ५३५० रुपये प्रती क्विंटल, हरभरा डाळ ५४०० ते ५५५० रुपये तर तूरडाळ ५७०० ते ६१५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव