भरमसाठ झालेली वृक्षतोड, त्यामुळे पर्यावरणाची झालेली हानी, ओझोन थराला पडलेले भगदाड, ऑक्सिजनचा दिवसेंदिवस भासत असलेला तुटवडा या सर्व गोष्टींचा मुख्य आधार वृक्ष आहे. म्हणून जास्तीत जास्त वृक्ष लागवड होऊन त्यांचे संवर्धन व्हावे याविषयी समाज जागृती व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुप जिल्हाध्यक्ष सविता माळी यांनी सांगीतले.
कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्षा लक्ष्मी बैरागी यांनी अजय नगर येथे केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सपोनि संदीपकुमार बोरसे होते. उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी केले. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वृक्षारोपण करून वृक्षांना राख्या बांधण्यात आल्या. कार्यक्रमास विलास मुळे, दिलीप गायकवाड, ए.एस.आय शेख, सुभाष चौधरी, रेखा देशमुख, नीलिमा झोपे, मालती पाटील, सीमा पारसे, जागृती पाटील, कस्तुराबाई इंगळे, श्रद्धा गायकवाड, गिरीश माळी, दीपेश पाटील, सूरज बैरागी यांची उपस्थित होते.