वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : येथील नगरपंचायतीची सभा प्रचंड गोंधळामुळे तहकूब करावी लागली. यावेळी विरोधकांनी चौदाव्या वित्त आयोगातून तीन कोटी रुपयांच्या उद्यानाच्या नियोजित कामांना प्रचंड विरोध केला. यामुळे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी काही वेळातच सभा तहकूब केली.विशिष्ट वॉर्डातच कामे होत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी उद्यानाच्या तसेच पेव्हर ब्लॉकच्या विषयाला नामंजुरी दिली. ठरावाच्या विरोधात बहुमत असल्याने हे विषय चांगलेच गाजले आणि प्रचंड गोंधळ झाला. यामुळे सभा तहकूब करण्याची वेळ आली.दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत विरोधकांनी काही कोंडून ठेवले होते, तर विविध कामांना विरोध झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते.तीन कोटी रुपयांचे उद्यानाचे कामे जिल्हाधिकाºयांकडून मंजूर झाले होते. मात्र कामांमध्ये राजकारण आणले जात असून विरोधकांकडून विकासकामांना खीळ घालण्याचा हा प्रकार आहे.- सुनील काळे, नगराध्यक्ष, वरणगाव
वरणगाव नगरपंचायतीची सभा गोंधळामुळे तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:36 IST
नगरपंचायतीची सभा प्रचंड गोंधळामुळे तहकूब करावी लागली.
वरणगाव नगरपंचायतीची सभा गोंधळामुळे तहकूब
ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांना घेराव विरोधक झाले आक्रमक