शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

वरणगाव न.पा.तर्फे वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:45 IST

जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहराचा वाढीव विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देदीपनगर प्रकल्पामुळे होणाºया प्रदुषणावर उपायशहरात पाणी पुरवठ्यासाठी नवीन पाईपलाईन व जलकुंभ

आॅनलाईन लोकमतवरणगाव, ता. भुसावळ : नगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येला समोर ठेवून वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत वरणगाव शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत असलेल्या पाणीपुरवठा योजनेवर ताण येतो, म्हणून नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना तयार करून नवीन पाईपलाईन व नारी मळा येथे नवीन पाणी टाकी उभारणे तसेच विस्तारित भागात नवीन टाक्या बांधणे आणि जलशुद्धीकरण योजनेच्या यंत्रणेत सुधारणा करणे, तसेच नवीन पाईप लाईन टाकणे, व संपूर्ण शहरात भूमिगत गटारी त्याचबरोबर रस्ते आणि घनकचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला. प्रकल्प सल्लागारही नेमण्याचा प्रस्ताव तत्काळ तयार करून शासनाकडे पाठविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. संपूर्ण शहरात केंद्र सरकारच्या योजनेतून ईसीएल एलईडी लाईट बसविण्याचा प्रस्ताव तयार करून त्याच्यावर कार्यवाही करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. बैठकीला उपनगराध्यक्ष शेख आखलाक शेख युसुफ, सभापती माला मेढे, शशी कोलते, नासरीनबी साजिद कुरेशी, संजीव माळी , दीपक भंगाळे उपस्थित होते.दीपनगर प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदुषणावर उपायशासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून संपूर्ण शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे, नगरपरिषद इमारतीत सौर ऊर्जेवर यंत्रणा चालवण्यासाठी निधीच्या मागणीचा प्रस्ताव तयार करण्यावरही स्थायी समितीच्या सभेत चर्चा करण्यात आली. तसेच दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातून होणारे प्रदूषण तत्काळ थांबवणे व वरणगाव शहरात जे प्रदूषण होत आहे. त्यावर उपाययोजना करून सीएसआर निधी वरणगाव शहरासाठी देण्यात यावा, अशा मागणीचा ठरावही यावेळी करण्यात आला. 

 

टॅग्स :Waterपाणी