शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

बहिणाबार्इंच्या काव्याचे मौल्यवान पैलू : रम्य कल्पनाविलास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:49 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा.ए.बी.पाटील यांनी ‘स्मृतीची चाळता पाने’ या सदरात ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याबद्दल सांगितलेले अनुभव.

निरक्षर बहिणाबार्इंच्या उत्कट काव्यात आचार्यांनी सांगितलेली काव्याची तत्त्वं दृष्टीस पडतात. उत्कट भाव व त्याबरोबरच विचार सौंदर्य आणि रम्य कल्पनाविलास हे त्यांच्या काव्याचे मौल्यवान पैलू आहेत. बहिणाबार्इंच्या काव्यात उत्कट भाव असे काही अभिव्यक्त झाले आहेत की, वाचणाऱ्याच्या हृदयात त्याच प्रकारच्या भावना उत्स्फूर्तपणे जागृत होतात.‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’सारख्या अप्रतिम काव्यपंक्ती तत्कालीन स्त्री जीवनाचे भावोत्कट कारुण्य प्रगट करतात. मोजक्या शब्दात एवढा मोठा आशय व्यक्त करणे भल्याभल्यांना जमत नाही. वाचक भारावून तर जातोच पण ह्या निरक्षर, अडाणी स्त्रीने तत्कालीन स्त्री जीवनाचा केवढा मोठा पट या पाच शब्दात मांडला आहे, ह्या विचाराने विस्मयचकितही होतो.बहिणाबार्इंची बुद्धी चौकस होती. रोजचे जीवन जगत असताना आस-पास घडत असलेले प्रसंग, घटना यांचे सूक्ष्म निरीक्षण ती करीत असावी. तिच्या मनावर ती घटना कोरली गेली की तिची सजग कल्पनाशक्ती त्या घटनेला शब्दबद्ध करून चित्रात्मक पद्धतीने प्रभावीरित्या अभिव्यक्त करत होती. मोटेचे पाणी तिच्या पुढील कुंड्यात (थायन्यात) धो-धो ओसंडतं. हे दृष्य पाहून बहिणाबाई ‘हुंदडतं पानी जसं तान्हं पायन्यात’ अशी सुंदर उपमा देऊन व्यक्त करतात. धरतीवरची हिरवळ उडत उडत आकाशात गेली व आकाशाचा रंग निळा झाला. अशा रम्य कल्पनांचा प्रयोग त्यांच्या काव्यात ठायी ठायी दिसतो. त्यांच्या काव्यात कल्पनेची भरारी आहे. पण त्याला वास्तवाची किनार आहे. हवेतल्या कोलांट उड्या नाहीत. वडाची हिरवी पानं व त्याला आलेली लालचुटूक फळं बघून वडाच्या झाडाला पोपटाचं पीक आल्याची कल्पना बहिणाबाईच करू शकते. रोजच्या जगण्यातही असे अनेक प्रसंग येतात ज्यांना बहिणाबाई आपल्या अलौकिक प्रतिभेने शब्दबद्ध करतात. चूल पेटत नाही, धूर करते आहे, गृहिणी बहिणाबाई वैतागते व म्हणते,‘पेट पेट धुक्कयेला किती घेशी माझा जीवअरे इस्तवाच्या धन्या कसं आलं तुले हीव।’विस्तवाला हीव येण्याची, थंडी वाजण्याची अफलातून कल्पना थक्क करणारी आहे. समाजात जगत असताना अवती भवती अनेक प्रकारची माणसे भेटत असतात. बहिणाबाई तिच्या भाषेत माणसंही वाचत होती. स्वार्थी माणसांचे लबाड व खोटे व्यवहार तिला रूचत नसावेत. ती म्हणते,‘पाहिसन रे लोकांचे व्यवहार खोटे नाटेतव्हा बोरी बाभयीच्या आले अंगावर काटे।’जगण्याशी व निसर्गाशी एकरूप असल्याशिवाय असे वर्णन शक्य नाही.सोपानदेवांनी एकदा बहिणाबाईला विचारले, ‘तू शेतात कष्टाची कामे करतेस, तुझी नजर जमिनीकडे आणि तुला हे सर्व विचार सुचतात तरी कसे?’ बहिणाबाईने उत्तर दिले, ‘धरतीच्या आरशामधी सरग (स्वर्ग) पाहते बाप्पा।’ (क्रमश:)