शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

जैवविविधतेने नटलेले वढोदा वनक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 11:00 PM

वढोदा हे जैवविविधतेने नटलेले वनक्षेत्र आहे.

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : पट्टेदार वाघाचा दोन दशकापासूनचा अधिवास, ग्रामस्थांकडून वाघांचे संवर्धन आणि संगोपन कार्यामुळे खान्देशात मानबिंदू ठरलेले वडोदा वनपरिक्षेत्र जैवविविधता संपन्न वनक्षेत्र बनले आहे. जैवविविधतेसाठी मुबलक अन्नजाळे, अन्नसाखळी, विपूल वनसंपदा, जंगलात पाण्याचे नैसर्गिक कृत्रिम पाणवठ्यासह मुबलक जलसाठा असलेले पूर्णा नदी पात्राचे सानिध्य वन्यजीवांच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांमधील जागरूकतायामुळे वडोदा वनपरिक्षेत्र जैवविविधतेने फुलले आहे.अगदी पट्टेदार वाघापासून तर दुर्मिळ उद मांजर, रानगवा तर सरपटणारे वन्यजीवांपाठोपाठ आणि मोर व परदेशी पाहुण्या पक्ष्यांचा अधिवास रुपी किलबिलाट येथे लाभतो. वनसंपत्तीत अंजन खैर, धावडा, सलई यासह शतावरी, अडुळसा, रांनझेंडू, रान तुळस या वनौषधी अशा अमूल्य ठेव्याने तब्बल १४ हजार हेक्टर क्षेत्र असलेल्या या वनपरिक्षेत्राला नैसर्गिक देण लाभली आहे.वैविध्यपूर्ण जैवविविधतावनपरिक्षेत्रात ६ पट्टेदार वाघांचे अधिवास यापूर्वी निष्पन्न झाले आहे. अलीकडे मार्चला एक पट्टेदार वयोवृध्द वाघीण मृत्यू पावली होती तर गेल्या कालखंडात दोन वेगवगळ्या घटनेत एक छावा व एक पट्टेदार वाघ दगावला आहे. अशात २०१९च्या प्राणी गणने दरम्यान दोन पट्टेदार वाघ दिसून आले आहेत. वाघांचा अधिवास कायम असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. प्राणी गणनेत वाघ २, तडस- ४, भेकर- १०७, अस्वल -५ , रानकुत्रं -७ , जंगली मांजर १४ रानडुकरे- ३२०, काळवीट-७५, चितळ ३८२, सांबार -६ मुंगूस १७, भेकर - १०४ कोल्हे- १४, लांडगे-९, नीलगायी- ४१९, चिंकरा- १७, उड मांजर -८, सायाळ- ४, ससे- २४, मोर- ८२, माकडे- १२६ यासह दूर्मिळ पक्षी - ६०, अशा एकूण १ हजार ७०५ वन्यजीवांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. यात अनेक दुर्मीळ वन्यजीव डोलारखेडा वनपरिक्षेत्रात आहेतदुर्मिळ योगडोलारखेडा ते दुई या सहा कि.मी. अंतरात एक पेक्षा जास्त पट्टेदार वाघ वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येत असल्याने वनविभाग ही चक्रावले आहे. व्याघ्र प्रकल्प वगळता पट्टेदार वाघ किमान ५ ते २५ कि.मी. परिघात एकटाच वास्तव्य करतो. अशात या ठिकाणी एकापेक्षा जास्त वाघ दिसून येत असल्याने हा दुर्मिळ प्रकार वनविभागासाठी संशोधनाचा विषय बनला आहे. त्यात भर म्हणून बिबटयाचा ही याच भागात वावर येथे असल्याने वाइल्ड लाइफ संशोधन व अभ्यासाची पर्वणी या वनपरिक्षेत्रात निर्माण झाली आहे.वाघाच्या संगोपनासाठी सर्व काहीवाघ जगले पाहिजे, त्यांचे संगोपन व्हायला पाहिजे ही शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची भावना कौतुकास्पद आहे. वाघाच्या संगोपनासाठी डोलारखेडा येथील ग्रामस्थांनी चक्क गावाचे व शेती शिवाराचे पुनर्वसन करण्यासाठी दाखविलेली तयारी महाराष्ट्रात वन्य जैवविविधता व संगोपनासाठी दिशादर्शक म्हणावी लागेल. सुकळी शिवारात नाना चव्हाण यांच्या शेतातही वाघिणीने दोन पिल्लांना जन्म दिला होता. वाघीण आणि छाव्यांच्या संगोपनासाठी त्या शेतकऱ्याने उभ्या केळी पिकाच्या उत्पन्नावर पाणी सोडले होते. राज्य शासनाकडून त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.उन्हाळ्यात पाण्यासाठी वन्यजीवाला धोकावन्यजीवांच्या अधिवासाने खुललेल्या या वनक्षेत्रात उन्हाळ्यात नैसर्गिक जलस्रोत आटतात. जंगलातील आतील भागात वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या ठिकाणी एकाच वेळेस विविध प्राणी व त्यांचे झुंड येऊ शकत नाही. परिणामी वन्यप्राणी या जंगलातून गेलेल्या मुक्ताईनगर कुऱ्हा हा मार्ग ओलांडून जंगलाच्या खालच्या बाजूला पाणी पिण्यासाठी पूर्णा नदी पात्रावर येतात. त्याची ही पाण्यासाठीचा राबता येथून रहदारी करणाऱ्या वाहनांमुळे अनेक वेळा धोक्याचा ठरतो. यातून वन्यजीव अपघाताला बळी पडतात. अगदी पट्टेदार वाघाचा छावा अशा अपघातात दगावला आहे.लॉकडाउन जैव विविधतेसाठी पर्वणीविस्तिर्ण अशा या वनपरिक्षेत्रात चारठाणा येथे भवानीमाता मंदिर पर्यटन क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. जागृत ग्रामस्थांनी कुऱ्हाड बंदी लागू करून हा परिसर वाढवला आहे. पुरातन भवानी माता मंदिर त्याला लागून मोठा तलाव घनदाट जंगल आणि पर्यटनासाठी विकसित केलेला हा परिसर जंगल सफारी घडवितो. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन असल्याने या जंगलातून जाणारा मुक्ताईनगर कुऱ्हा मार्गावरील वाहनांची वर्दळ नसल्यासारखी आहे तर कोरोना सावट पसरल्याने ग्रामस्थ, पाळीव प्राणी यांचा जंगलातील हस्तक्षेप पूर्णपणे बंद आहे. प्रदूषण मुक्त परिसरात मानवी हस्तक्षेप ही नसल्याने जैवविविधता अधिक खुलली आहे. अगदी वन्यजीवांचा मुक्तसंचार दिवसालाही होत आहे.कुऱ्हा वदोडा वनक्षेत्र हे खान्देश कुशीत बसलेले एक निसर्गसंपन्न असे काश्मीर म्हणावे तसे आहे. कारण असे की विविध प्रकारच्या वनसंपत्तीने हा संपूर्ण परिसर नटलेला आहे. एवढेच नाही तर निसर्गाच्या सानिध्यात असंख्य प्राणी, पशु, पक्षी, जमिनीवर सरपटणारे अनेक प्रकारचे निसर्ग घटक येथे दिसतात. भरगच्चअशा विविध औषधी वनस्पती येथे आढळून येतात. पर्यावरण अभ्यासक वर्गासाठी पर्यावरणाचा घटकांचा अत्यंत सूक्ष्म अभ्यासासाठी उपयुक्त असा हा निसर्ग परिसर आहे.-प्रशांतराज तायडे, पर्यावरण तज्ञ तथा राष्ट्रीय हरित सेना शिक्षक, मुक्ताईनगर.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारMuktainagarमुक्ताईनगर