साजगाव ग्रामपंचायतीत रिक्त झालेल्या उपसरपंचपदाच्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम नुकताच पार पडला. या जागेसाठी पाचोरा तालुका शिवसेना शहर संघटक विशाल रामसिंग पाटील यांच्या पत्नी उषाबाई विशाल पाटील यांनी प्रतिस्पर्धी सरला समाधान गायकवाड यांचा ४-३च्या फरकाने पराभव केला. निवडणूक प्रक्रियेत सरपंच समाधान भिल्ल, ग्रामपंचायत सदस्य गुरुलाल पवार, गिरीश पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.
ग्रामविस्तार अधिकारी आर.एस. धस व ग्रामसेवक वासुदेव पाटील यांनी काम पाहिले.
याप्रसंगी माजी जि.प. सदस्य गुलाबसिंग पाटील, दगडू हिलाल पाटील, अमरसिंग पाटील, राजेंद्र महादू पाटील, विशाल दगडू पाटील जळगाव, दत्तू त्रंबक पाटील, जगन न्हावी, शिवाजी खुशाल पाटील, अरुण जोशी, ज्ञानेश्वर पवार, अनिल पवार, विठ्ठल पाटील, सचिन वाघ, समाधान पाटील, राजेंद्र देवसिंग पाटील, सतीश भगवान पाटील, संदीप पाटील, विजयसिंह पाटील, विशाल रामसिंग पाटील, विठ्ठल पवार, गोविंदा पाटील, रवींद्र पाटील, योगेश कोळी, ठाणसिंग पाटील, धीरज पाटील आदी उपस्थित होते.