पाचोरा : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा तसेच इफको अंतर्गत पाचोरा तालुक्यातील दिघी येथे कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर या विषयावर मार्गदर्शन वर्ग राबविण्यात आले. या वेळी सरपंच शांताराम बाबूलाल कोष्टी, ग्रा.पं. सदस्य भारत मोरे, रामधन परदेशी व गावातील शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मंडळ कृषी अधिकारी ए.व्ही. जाधव यांनी विभागाच्या योजना शेतकऱ्यांना सांगितल्या व इफको कंपनीचे केशव शिंदे यांनी खतांचा संतुलित वापर व खतांची बचत याबाबत मार्गदर्शन केले व इफको नॅनो युरियाबाबत मार्गदर्शन करताना सदर युरिया १ जुलैपासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले. तसेच इफको कंपनीमार्फत भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने शेतकऱ्यांना भाजीपाला परसबाग किट वाटप करण्यात आले, तसेच गट स्थापनेबाबत सचिन भैरव यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश पाटील यांनी केले. सदरील कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी ए.व्ही. जाधव, कृषी पर्यवेक्षक निकम, कृषी सहायक उमेश पाटील, तालुका तंत्रज्ञान व्यस्थापक सचिन भैरव, समूह सहायक साबीर शेख उपस्थित होते.
शेतीसाठी खतांचा संतुलित वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST